Three killed in ambulance and two-wheeler accident in jaipur | रुग्णवाहिका अन् दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

रुग्णवाहिका अन् दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

ठळक मुद्देजयपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 16 वरील नेलापूरजवळ हा भीषण अपघात घडला. सध्या या मार्गावरील एका बाजूचा रस्ता बंद करण्यात आला आहे. या मार्गावर रस्ता दूरुस्तीचं काम सुरू आहे.

जयपूर - रुग्णवाहिका आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. जयपूरमध्ये ही दुर्घटना घडली असून रुग्णवाहिका व दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याचे स्थानिकांनी सांगितलं. मृत तिघांमध्ये एक महिला व लहान मुलाचाही समावेश असून तिघेही दुचाकीवरुन प्रवास करत होते. 

जयपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 16 वरील नेलापूरजवळ हा भीषण अपघात घडला. सध्या या मार्गावरील एका बाजूचा रस्ता बंद करण्यात आला आहे. या मार्गावर रस्ता दूरुस्तीचं काम सुरू आहे. दुर्घटना घडलेल्या रुग्णावाहिकेत एकही रुग्ण नव्हता. तर, अपघातानंतर रुग्णावाहिकेच्या ड्रायव्हरने घटनास्थळावरुन धूम ठोकली आहे. अपघात पाहून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत, संबंधित प्रशासन व पोलीस यंत्रणांशी संपर्क साधला. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

दरम्यान, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवा तत्परतेनं काम करत आहे, त्यामुळेच, रुग्णावाहिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक दिसून येते. 


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Three killed in ambulance and two-wheeler accident in jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.