साध्वी प्रज्ञा सिंहांचा 'योगी फॉर्म्युला', प्रचारबंदीनंतर मंदिरात गायलं भजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 01:26 PM2019-05-02T13:26:04+5:302019-05-02T13:27:30+5:30

पूजा-अर्चा केल्यानंतर मंदिरात भजन गायले.

sadhvi pragya bhajan in mandir bhopal election commission ban lok sabha elections | साध्वी प्रज्ञा सिंहांचा 'योगी फॉर्म्युला', प्रचारबंदीनंतर मंदिरात गायलं भजन 

साध्वी प्रज्ञा सिंहांचा 'योगी फॉर्म्युला', प्रचारबंदीनंतर मंदिरात गायलं भजन 

googlenewsNext

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळ मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत येत आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रचारादरम्यान बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. 

निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर 72 तास अर्थात तीन दिवसांसाठी प्रचारबंदी लागू केली आली आहे. दरम्यान, या प्रचारबंदीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे त्यांनीही मंदिरात जाऊन पूजा केली आणि भजनही केले. 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाने आजपासून प्रचार बंदी घातली आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आज भोपाळमधील एका दुर्गा मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी पूजा-अर्चा केल्यानंतर मंदिरात भजन गायले. तसेच, मंदिरात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पाच वेळा हनुमान चालीसाचे पठण केले.

भोपाळमधून भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर  यांनी बाबरी मशिदीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच त्याबाबत बोलताना आनंद व्यक्त केला होता. या कृत्याचा आपल्याला गर्व असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

या वादग्रस्त वक्तव्याबाबत कारवाई म्हणून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाकडून 72 तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून ही बंदी लागू झाली आहे. या काळात त्या कोणत्याही प्रचार रॅलीत, सभेत सहभागी होऊ शकणार नाहीत. तसेच कोणतीही मुलाखत तसेच प्रतिक्रियाही त्यांना देता येणार नाही.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ यांच्यावरही वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने 72 तासांची प्रचारबंदी घातली होती. या बंदीनंतर योगी आदित्यानाथ यांनी उत्तर प्रदेशातील मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करुन लोकांच्या भेटी घेतल्या होत्या. 
 

Web Title: sadhvi pragya bhajan in mandir bhopal election commission ban lok sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.