‘मी शहिदांचा अपमान केला नाही’, साध्वी प्रज्ञा सिंहांचे निवडणूक आयोगाला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 10:51 PM2019-04-21T22:51:38+5:302019-04-21T22:59:07+5:30

नोटिसीला उत्तर देताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहिदांचा अपमान केला नाही, असे म्हटले आहे.

Pragya Singh Thakur's reply to EC on the show cause notice served to her | ‘मी शहिदांचा अपमान केला नाही’, साध्वी प्रज्ञा सिंहांचे निवडणूक आयोगाला उत्तर

‘मी शहिदांचा अपमान केला नाही’, साध्वी प्रज्ञा सिंहांचे निवडणूक आयोगाला उत्तर

Next

भोपाळ : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली होती. या नोटिसीला उत्तर देताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहिदांचा अपमान केला नाही, असे म्हटले आहे.

"मी कोणत्याही शहीदाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. माझ्या भाषणातील एक लाइन पाहून चालणार नाही, तर पूर्ण भाषण पाहावे. तत्कालीन काँग्रेस सरकारकडून मला जो त्रास देण्यात आला होता, त्याचा मी उल्लेख केला होता.", असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. 


"माझ्यासोबत जे काही घडले, ते जनतेच्या समोर आणले आणि माझा अधिकार आहे. माझ्या वक्तव्य मीडियाने तोडून-मोडून प्रसारित केले. दरम्यान, जनभावनेचा सन्मान करत माझे वक्तव्य मागे घेतले आहे. मी असे कोणतेही कृत्य केले नाही किंवा भाषण केले नाही, ज्यामुळे आचार संहिता भंग होईल", असेही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मध्य प्रदेशातील भोपाळ मतदार संघासाठी भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर एका सभेत त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल असं वादग्रस्त विधान करुन खळबळ उडवून दिली होती. "हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले, त्यांना सांगितले होते की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या  कर्मानेच मृत्यू झाला," असे धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते.  

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर काय म्हणाल्या होत्या, वाचा त्यांच्याच भाषेत.....
"वो जांच अधिकारी सुरक्षा आयोग का सदस्य था, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया और कहा कि साध्वी को छोड़ दो. लेकिन हेमंत करकरे ने कहा कि मैं कुछ भी करूंगा लेकिन सबूत लाउंगा और साध्वी को नहीं छोड़ूंगा."
"ये उसकी कुटिलता था ये देशद्रोह था धर्मविरुद्ध था, वो मुझसे पूछता था कि क्या मुझे सच के लिए भगवान के पास जाना होगा, तो मैंने कहा था कि आपको जरूरत है तो जाइए."
"मैंने उसे कहा था तेरा सर्वनाश होगा, उसने मुझे गालियां दी थीं. जिसदिन मैं गई तो उसके यहां सूतक लगा था और जब उसे आतंकियों ने मारा तो सूतक खत्म हुआ."


भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Web Title: Pragya Singh Thakur's reply to EC on the show cause notice served to her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.