The name of the village named 'flood baby' is the name of the child born in the village of jalandhar flood. | महापूराच्या पाण्यात अडकलं गाव, जन्मलेल्या मुलाचं आई-वडिलांनी ठेवलं 'हे' नाव 
महापूराच्या पाण्यात अडकलं गाव, जन्मलेल्या मुलाचं आई-वडिलांनी ठेवलं 'हे' नाव 

जालंधर - पंजाबमध्येही महापूराने थैमान घातले असून पुराच्या पाण्यात अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. पूरग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत होते. त्यात, एका गरोदर महिलेलाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. लाखो लोक बेघर होत होती, अनेकांना जीव मुठीत धरून स्वत:ला सावरावे लागत होते, संकटांचा महापूर आला होता. त्यातच, एका मुलाने जन्म घेतला. दु:खातही सुखाची झुळूक यावी, तसा आनंद या मुलाच्या जन्माने सर्वांना झाला. 

जालंधर जिल्ह्यातील गाव नसीरपूर येथील आरोग्य केंद्रात गीता राणी यांनी पूरस्थितीत एका मुलीला जन्म दिला. सतलूजचा बांध फुटला होता, सगळीकडे पाणी-पाणी झाले होते. गावातही सर्वत्र पाणी शिरले होते. त्या स्थितीत स्वर्नसिंह यांनी लोहिया खास येथील आरोग्य केंद्रात आपल्या पत्नीला पोहोचवले. गीता राणी यांनी येथे मुलाला जन्म दिला. त्यानंतर, पूरस्थिचा अंदाज घेऊन भीतीदायक वातावरणात जन्मलेल्या या मुलाची चर्चा परिसरात चांगलीच रंगली होती. त्यामुळे, आपल्या मुलाचे नाव Flood baby ठेवण्याचा निर्णय कुटुंबीयांना घेतला. त्यानुसार, या मुलाचे नाव फ्लड बेबी ठेवण्यात आले आहे. मुलाच्या जन्मानंतर गीता राणी आपल्या लहान मुलासह एका नातेवाईकांच्या घरी राहात आहेत.   
 


Web Title: The name of the village named 'flood baby' is the name of the child born in the village of jalandhar flood.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.