Lok Sabha Election 2019 Result : पूर्वोत्तर भारतात कमळ उमलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:33 AM2019-05-23T11:33:35+5:302019-05-23T12:26:55+5:30

पूर्वोत्तर भारतात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या सात राज्यांचा समावेश होतो. यापैकी एकट्या आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत.

lok sabha election results 2019 who will win Northeast India bjp or congress | Lok Sabha Election 2019 Result : पूर्वोत्तर भारतात कमळ उमलणार?

Lok Sabha Election 2019 Result : पूर्वोत्तर भारतात कमळ उमलणार?

Next
ठळक मुद्देपूर्वोत्तर भारतात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या सात राज्यांचा समावेश होतो. आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत. तर उर्वरित सहा राज्यांत 11 जागा आहेत. पूर्वोत्तर भारतातील 25 जागा भाजपा आणि काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आहेत. 

नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या राज्यांसोबतच पूर्वोत्तर भारतातील छोटी छोटी राज्येही चर्चेत राहिली. त्याला कारण ठरले ते म्हणजे गेल्या लोकसभा  निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या या भागावर केंद्रित केलेले लक्ष. काही वर्षांपूर्वी पूर्वोत्तर भारतात नाममात्र असलेल्या भाजपाने मागच्या पाच  वर्षांमध्ये स्थानिक पक्षांशी आघाड्या करत अनेक राज्यांमध्ये सत्ता प्राप्त केली आहे. मात्र नागरिकत्व कायद्यामुळे या भागात भाजपाविरोधात नाराजी आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत लोकसभेच्या 25 जागा असलेल्या पूर्वोत्तर भाजपाला यश मिळते की या भागात बँकफूटवर गेलेली काँग्रेस आणि स्थानिक पक्ष कमबँक करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूर्वोत्तर भारतात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या सात राज्यांचा समावेश होतो. यापैकी एकट्या आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत. तर उर्वरित सहा राज्यांत 11 जागा आहेत. पूर्वोत्तर भारतातील 25 जागा भाजपा आणि काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आहेत. आसाम (14)

आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत. भाजपाने 2014 मध्ये 7 जागा जिंकून बाजी मारली होती. तर भाजपाच्या मतांमध्ये सुमारे 20 टक्के वाढ होऊन ती 36.5 टक्के झाली. तसेच काँग्रेसची मते सुमारे 4.5 टक्क्यांनी कमी होऊन त्यांना तीन जागा मिळाल्या होत्या.

अरुणाचल प्रदेश (2)

अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या 2 जागा आहेत. भाजपा आणि काँग्रेसने 2014 मध्ये प्रत्येकी एक जागा जिंकली होती. मात्र यावेळी भाजपाने दोन्ही जागा जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. आसाममध्ये भाजपाचे सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री असून, त्यात बीपीएफ व एजीपी (आसाम गण परिषद) आहे.

मणिपूर (2)

मणिपूरमध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत. दोन निवडणुकींमध्ये या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले एन बिरेन सिंग मणिपुरमध्ये मुख्यमंत्री असले तरी सत्तेत एनपीपी, एनपीएफ व एलजेपी यांचा सहभाग आहे.

मिझोराम  (1)

मिझोराममध्ये लोकसभेची एक जागा आहे. लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे झोरामथंगा मुख्यमंत्री असून, त्या सरकारमध्ये भाजपा आहे.

मेघालय (2)

मेघालयमध्ये लोकसभेच्या दोन जागा आहे. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने एक जागा तर स्थानिक पक्षाने एक जागा  जिंकली होती. मेघालयमध्ये एनपीपीचे कोनराड संगमा मुख्यमंत्री असून, त्या सरकारमध्ये भाजपा व अन्य तीन प्रादेशिक पक्ष आहेत. 

नागालँड (1)

नागालँडमध्ये लोकसभेची एक जागा आहे. स्थानिक एनपीएफ या पक्षाला सलग दोन निवडणुकांमध्ये याआधी विजय मिळाला आहे. नागालँडमध्ये एनडीडीपीच्या नैफिऊ रिओ मुख्यमंत्री आहेत आणि सत्तेत भाजपा, जनता दल (संयुक्त) व नॅशनल पीपल्स फ्रंट (एनपीपी) आहे. 

सिक्कीम (1)

सिक्कीममध्ये लोकसभेची एक जागा आहे. 2014 च्या निवडणुकीत ही जागा स्थानिक एसडीएफ या पक्षाला मिळाली होती. सिक्किममध्येसिक्किम डेमॉक्रेटिक फ्रंटचे पवनकुमार चामलिंग ही भाजपच्या नेडामध्ये आहेत.

त्रिपुरा (2)

त्रिपुरामध्ये लोकसभेच्या 2 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या जागा सीपीएमला मिळाल्या होत्या. त्रिपुरात भाजपाचे बिप्लब देव मुख्यमंत्री आहेत, पण त्या सरकारमध्येही आयपीएफटी हा पक्ष आहे.


 

Web Title: lok sabha election results 2019 who will win Northeast India bjp or congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.