Gharwapsi: मुस्लीम कटुंबातील 18 जणांनी स्विकारला हिंदू धर्म, शेण अन् गोमुत्राने अंघोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 04:24 PM2022-06-10T16:24:56+5:302022-06-10T16:27:06+5:30

धर्मांतरणापूर्वी सर्वांनी शपथपत्र तयार केलं होतं. त्यामध्ये, आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता धर्मांतर करत असल्याचं त्यांनी म्हटलं

Gharwapsi: 18 members of Muslim family accept Hinduism, bath with dung and urine in ratlam madhya pradesh | Gharwapsi: मुस्लीम कटुंबातील 18 जणांनी स्विकारला हिंदू धर्म, शेण अन् गोमुत्राने अंघोळ

Gharwapsi: मुस्लीम कटुंबातील 18 जणांनी स्विकारला हिंदू धर्म, शेण अन् गोमुत्राने अंघोळ

googlenewsNext

भोपाळ - मध्य प्रदेशात गेल्या 15 दिवसांत मुस्लीम धर्मातून हिंदू बनल्याचे दुसरे मोठे प्रकरण समोर आले आहे. यावेळी, रतलामच्या आम्बा येथील एकाच कुटुंबातील 18 जणांनी धर्मांतर केले आहे. कुटुंबातील प्रमुख असलेले मोहम्मद शाह आता राम सिंह बनले आहेत. येथील भीमनाथ मंदिरात महाशिवपुराणच्या पूर्णाहुतीनंतर स्वामी आनंदगिरी महाराज यांच्या सानिध्यात सर्वांनी हिंदू धर्म स्विकारला. यावेळी, शेण आणि गोमुत्राने अंघोळ करत सर्वांनी जानवं धारण केलं. 

धर्मांतरणापूर्वी सर्वांनी शपथपत्र तयार केलं होतं. त्यामध्ये, आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता धर्मांतर करत असल्याचं त्यांनी म्हटलं. या कुटुंबाच्या प्रमुखांनी स्वामी आनंदगिरी यांच्याकडे जाऊन धर्मांतर करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. दरम्यान, 13 दिवसांपूर्वी मंदसौरमध्ये शेख जफर शेख, वडिल गुलाम मोइनुद्दीन शेख यांनी हिंदू धर्म स्विकारला आहे. आता ते चेतनसिंह राजपूतच्या नावाने ओळखले जातात. त्यांची पत्नी अगोदर हिंदू धर्मीय होती. शेख जफरने भगवान पशुपतिनाथ मंदिराच्या प्रांगणात धर्मांतर केले. 

आता, गावगोवी फिरुन आयुर्वैदीक आणि तावीज विकणाऱ्या 55 वर्षीय मोहम्मद शाह यांनी कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसमवेत धर्मांतर केलं आहे. स्वामी आनंदगिरी महाराज यांनी धर्मांतराला मान्यता दिल्यानंतर, न्यायालयातून शपथपत्र बनवून घेण्याचे मोहम्मद यांना सूचवले होते. त्यानंतर, स्वामींनी भीमनाथ मंदिराजवळील कुंडमध्ये संपूर्ण कुटुंबाला शेण आणि गोमुत्राने अंघोळ घातली. तर, जानवं धारण करुन, भगवं वस्त्र परिधआन करुन जय श्रीराम, जय महाकाल आणि सनातन धर्माचा जयघोष करायला लावला.

दरम्यान, दोन-तीन पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज हे बोदी समाजाचे असून पुंगी वाजविण्याचं काम करत होते. त्यानंतर, रोजगाराच्या शोधात आयुर्वैदीक औषधे आणि ताविज बनवून विकण्यासाठी इतरत्र भटकत राहिले. त्यातूनच त्यांनी मुस्लीम धर्म स्विकारल्याचे मोहम्मद शहा यांनी यावेळी म्हटले. तसेच, आता पुन्हा हिंदू धर्मात आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.   
 

Web Title: Gharwapsi: 18 members of Muslim family accept Hinduism, bath with dung and urine in ratlam madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.