first parliament session of modi government 2 likely to be start in first week of june | मोदी सरकार-2चं पहिलं संसदीय अधिवेशन जूनच्या पहिल्या आठवड्यात; जुलैमध्ये अर्थसंकल्प
मोदी सरकार-2चं पहिलं संसदीय अधिवेशन जूनच्या पहिल्या आठवड्यात; जुलैमध्ये अर्थसंकल्प

नवी दिल्ली: भाजपानं लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता दिल्लीत नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन 5 ते 15 जून या काळात होण्याची शक्यता आहे. तर जुलै महिन्यात मोदी सरकार-2 आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामधून सरकार अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत तब्बल 303 जागा जिंकत विक्रमी कामगिरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या आईची भेट घेण्यासाठी गुजरातला गेले आहेत. 30 मे रोजी ते पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यावेळी काही मंत्रीदेखील त्यांच्यासोबत शपथ घेऊ शकतात. यानंतर आठवड्याभरात राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होईल. या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाईल. 

मोदी सरकार-2 जुलैमध्ये आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. भाजपानं लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध केलेल्या संकल्पपत्रात अनेक महत्त्वपूर्ण आश्वासनं दिली होती. त्यांची घोषणा अर्थसंकल्पातून केली जाऊ शकते. अल्प भूधारक शेतकऱ्यांना, लहान दुकानदारांना निवृत्ती वेतन, जीएसटीच्या टप्प्यात महत्त्वाचे बदल, सर्वांना कर्जमाफी योजना अशा महत्त्वपूर्ण घोषणा या अर्थसंकल्पातून केल्या जाऊ शकतात. 
 


Web Title: first parliament session of modi government 2 likely to be start in first week of june
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.