... तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी; डीके शिवकुमार यांच्या खासदार भावाचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 05:28 PM2024-02-01T17:28:14+5:302024-02-01T17:28:47+5:30

अर्थमंत्र्यांच्या राज्यातील खासदाराकडून वादग्रस्त वक्तव्य. उत्तरेकडील राज्यांवर गंभीर आरोप.

Demand for making South India a separate country; Controversial statement of DK Shivakumar's MP brother DK Suresh on Budget 2024 fund allocation by Nirmala Sitharaman | ... तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी; डीके शिवकुमार यांच्या खासदार भावाचे वादग्रस्त वक्तव्य

... तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी; डीके शिवकुमार यांच्या खासदार भावाचे वादग्रस्त वक्तव्य

कर्नाटकचेकाँग्रेस खासदार डी के सुरेश यांनी अर्थसंकल्पानंतर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्र डी के शिवकुमार यांचे भाऊ असलेल्या सुरेश यांनी दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करावी लागेल, असे वक्तव्य सुरेश यांनी केले आहे. यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असून भाजपाने सुरेश यांच्यावर टीका केली आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना डीके सुरेश यांनी वरील वक्तव्य केले आहे. केंद्राने आम्हाला जे पैसे देणे बाकी आहेत ते जरी आम्हाला दिले तर ते पुरेसे होईल. जीएसटी म्हणून जमा केलेले कर, सीमाशुल्क आणि प्रत्यक्ष कर आमच्यापर्यंत पोहोचायला हवेत. दक्षिण भारतासोबत खूप चुकीचे घडतेय हे आम्ही पाहत आहोत, असा आरोप सुरेश यांनी केला. 

विकासाच्या निधीतील आमचा वाटा उत्तर भारतात वळवला जात आहे. सर्व बाबतीत आमच्याशी चुकीचे वागले जात आहे, असा आरोप सुरेश यांनी केला. याचबरोबर आपण जर याचा विरोध केला नाही तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी करावी लागेल. हिंदी राज्ये ती करण्यासाठी आम्हाला भाग पाडत आहेत, असे सुरेश म्हणाले. 

यावर कर्नाटकचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशाच भावनांमुळे फाळणी झाल्याची टीका अशोक यांनी केली आहे. 

Web Title: Demand for making South India a separate country; Controversial statement of DK Shivakumar's MP brother DK Suresh on Budget 2024 fund allocation by Nirmala Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.