येवला ते तुळजापूर सायकल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:28 IST2020-12-21T23:45:37+5:302020-12-22T00:28:12+5:30

येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक संदेश देत समाज प्रबोधन करणारी येवला ते तुळजापूर सायकल यात्रा नुकतीच मार्गस्थ झाली आहे.

Yeola to Tuljapur cycle journey | येवला ते तुळजापूर सायकल यात्रा

येवला ते तुळजापूर सायकल यात्रेत सहभागी सायकलपटू.

ठळक मुद्देसमाज प्रबोधन : जय भवानी संस्थेचा उपक्रम

येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक संदेश देत समाज प्रबोधन करणारी येवला ते तुळजापूर सायकल यात्रा नुकतीच मार्गस्थ झाली आहे.
गेल्या १४ वर्षांपासून संस्थेच्या वतीने येवला ते तुळजापूर-अक्कलकोट-गाणगापूर असे सायकल यात्रेचे नियोजन केले जाते. या यात्रेदरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवत ह्यसायकल चालवा -देश वाचवाह्ण, ह्यपाणी आडवा -पाणी जिरवाह्ण, ह्यबेटी बचावह्ण, वन्यजीव संरक्षण व नैसर्गिक संसाधनांचे जतन, वाहतूक सुरक्षा तसेच रक्तदान, अवयव दान आदी विषयांवर जनजागृती मोहीम राबविली जात असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय भोरकडे यांनी सांगितले. किशोर खोकले यांनी संस्थेमार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
यंदा सायकल यात्रेमध्ये २७ सायकल यात्रींनी सहभाग नोंदविला आहे. यात प्रामुख्याने महिला सायकल यात्री पूजा आव्हाड, नवनाथ भोरकडे, किरण खोकले, गोरख घोटेकर, विक्रम आव्हाड, सतीश दिघे, गणेश भोरकडे, गणेश मोरे, वासुदेव साळुंखे, सचिन कुटे, मनीष खोकले, नितीन कोकाटे, गोरख घोटेकर, विवेक लगड, अरुण खोकले, वैभव मोरे, कैलास सलमुठे, गणेश सोमासे, विशाल शिंगाडे, कारभारी भोरकडे, प्रभाकर डुंबरे, लक्ष्मण बनकर, अमोल महाले, सचिन भोसले व भिकन सोनवणे आदींचा सहभाग आहे.
 

Web Title: Yeola to Tuljapur cycle journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.