Yeola: The true match in the army-nationalist | येवला : सेना-राष्ट्रवादीत खरा सामना
येवला : सेना-राष्ट्रवादीत खरा सामना

येवला : उमेदवारी अर्ज माघारीनंतर येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, एकूण ८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आहे.
सन २००४च्या विधानसभेत छगन भुजबळ यांनी पाय रोवल्यापासून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत बंडखोरीची लागण सेना अथवा भाजप कोणालाही झाली नाही हे विशेष. येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे निवडणूक लढवीत आहेत. शिवसेनेचे संभाजीराजे साहेबराव पवार यांच्यात प्रमुख लढत होत आहे. उर्वरित सहा उमेदवारांत बहुजन समाज पक्षाचे एकनाथ रामचंद्र गायकवाड, वंचित आघाडीचे सचिन वसंतराव अलगट, अपक्ष उमेदवार विजय दत्तू सानप, संजय पोपट पवार, सुभाष सोपान भागवत, महेंद्र गौतम पगारे यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा २६ मतदान केंद्रांची वाढ झाली असून, मतदारांची संख्यासुद्धा २१ हजारांनी वाढली आहे. सध्या मतदारसंघात एकूण ३१४ मतदान केंद्र असून, मतदारसंख्या दोन लाख ९५ हजार ८५ इतकी आहे.
विधानसभा मतदारसंघात येवले तालुक्यातील १२४ आणि निफाड तालुक्यातील लासलगाव विंचूर परिसरातील ४२ गावांचा मिळून येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ आहे. गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी वाढलेली मतदारसंख्या आणि मतदान केंद्र ही कुणाच्या फायद्याचे ठरणार हे गणित मांडणे अवघड असले
तरी मतदारसंख्या वाढल्यामुळे उमेदवारांना जास्त फिरण्याची वेळ येणार आहे.
तर मतदान केंद्र वाढल्यामुळे मतदारांना जास्त वेळ रांगेत राहण्याची वेळ येणार नाही असा दुहेरी फायदा झालेला दिसतो.
यावेळी एका मतदान केंद्रावर 1200 ते 1500 पर्यंत मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांची वाढ गृहीत धरून मतदान केंद्रात वाढ झाल्याचेही दिसते. मतदारसंघातील पुरणगाव हे एकमेव संवेदनशील केंद्र आहे.
मतदारसंघात १ लाख ५५ हजार ४४६ पुरु ष तर १ लाख ३९ हजार ६६३ महिला आणि ६ तृतीयपंथी मतदार असून एकूण मतदारसंख्या २ लाख ९५ हजार आहे. तर अपंग मतदारांची लोकसंख्या ८२३ असून यातील ६०० पर्यंत मतदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मतदारसख्या २ लाख ७४ हजार ३३ इतकी होती. त्यावेळी मतदान केंद्र संख्या २८८ होती. मतदारांचा आकडा तीन लाखापर्यंत गेल्याने उमेदवार व कार्यकत्यांची प्रचारासाठी फेºया वाढताना दिसतील.
रिंगणातील उमेदवार...
एकनाथ गायकवाड (बहुजन समाज पक्ष), छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस), संभाजी पवार (शिवसेना), सचिन अलगट (वंचित बहुजन आघाडी), सुभाष भागवत (महाराष्ट्र क्र ांती सेना), महेंद्र पगारे (अपक्ष), विजय सानप (अपक्ष), संजय पवार (अपक्ष).
२०१४ मध्ये होते ११ उमेदवार । यंदा आहेत एकूण ८ उमेदवार

Web Title:  Yeola: The true match in the army-nationalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.