स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये महिला दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:26 IST2021-03-10T21:55:18+5:302021-03-11T01:26:05+5:30

येवला : श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संस्थेच्या येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए.जी. नाकील होते. व्यासपीठावर उपप्राचार्य अंबादास ढोले, अशोक सोमवंशी, पर्यवेक्षक एम. एस. पहिलवान, जेष्ठ शिक्षिका सौ पुष्पा मुंढे, माया हादगे, सीमा पैंजणे, सुषमा नागडेकर, जयश्री नागपुरे, कविता गावडे, डॉ. मनीषा गोसावी, आशा डांगरे उपस्थित होत्या.

Women's Day at Swami Muktanand Vidyalaya | स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये महिला दिन

येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयात शिक्षिकांच्या सन्मानप्रसंगीचे प्राचार्य ए. जी. नाकील, उपप्राचार्य अंबादास ढोले, पर्यवेक्षक एम. एस. पहिलवान, जी. टी. धिवर, के. आर. तुपसैंदर आदी.

ठळक मुद्देअध्यक्षस्थानी प्राचार्य ए.जी. नाकील होते.

येवला : श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संस्थेच्या येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए.जी. नाकील होते. व्यासपीठावर उपप्राचार्य अंबादास ढोले, अशोक सोमवंशी, पर्यवेक्षक एम. एस. पहिलवान, जेष्ठ शिक्षिका सौ पुष्पा मुंढे, माया हादगे, सीमा पैंजणे, सुषमा नागडेकर, जयश्री नागपुरे, कविता गावडे, डॉ. मनीषा गोसावी, आशा डांगरे उपस्थित होत्या.

व्यासपीठावरील जेष्ठ शिक्षिकांचा विद्यार्थिनी प्रगती धुमाळ, पायल जगताप, पायल कोतवाल, भाग्यश्री गुजर, तन्वी मेहतर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आले. श्री ज्ञानेश्वरी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी प्रेम मुळे, रोहण कायस्थ, सिद्धार्थ गायके, कार्तिक चौधरी, प्रांजल बनछोड यांचा धनादेश व प्रमाणपत्रासह गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. महिला दिनाबद्दल विद्यार्थी विशाल मोरे याने मनोगत व्यक्त केले.

Web Title: Women's Day at Swami Muktanand Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.