दिव्यांगांना दिली मायेची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:14 IST2021-01-25T18:11:58+5:302021-01-25T18:14:27+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील गरीब गरजू नागरिकांसाठी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले असून त्याचा ७ वा टप्पा घोटीत पार पडला. यावेळी १७९ गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

दिव्यांग बांधवांना ब्लॅकेट वाटप करता मान्यवर.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील गरीब गरजू नागरिकांसाठी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले असून त्याचा ७ वा टप्पा घोटीत पार पडला. यावेळी १७९ गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी मनोगत व्यक्त केले. जनसेवा प्रतिष्ठान व चंद्रीकाबेन गाला, सिनीअर सिटीजन मुंबई, नितीन कोठारी यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू व दिव्यांग बांधवांना जैन भवन येथे शनिवारी (दि.२३) ब्लँकेट वाटपाचा टप्पा पुर्ण करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, माजी सैनिक हरिष चौबे, अनिल नाठे, भाजपा ओबीसी प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ, उपजिल्हाध्यक्ष रमेश परदेशी, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, ग्रामपंचायत सदस्य संजय आरोटे, वैशाली गोसावी, ॲड. विजय कर्नावट आदी उपस्थित होते. दुर्गम परिसरात राहणाऱ्या दिव्यांग बांधवांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते १७९ ब्लॅकेट वाटप करण्यात आले.