महामार्गावर ट्रकमधुन डिझेल चोरणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 22:18 IST2021-11-03T22:17:50+5:302021-11-03T22:18:16+5:30

इगतपुरी : येथील नाशिक- मुबंई महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरा जवळील रोडच्या साईड पाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यानी ट्रकचे लॉक तोडून मोबाईल व रोख दहा हजार रुपये व डिझेल चोरी केली.

Two arrested for stealing diesel from a truck on the highway | महामार्गावर ट्रकमधुन डिझेल चोरणारे दोघे ताब्यात

महामार्गावर ट्रकमधुन डिझेल चोरणारे दोघे ताब्यात

ठळक मुद्देइगतपुरी : ८५ हजाराचा मुद्देकाल जप्त ; दोघे फरार

लोकमत न्युज नेटवर्क

इगतपुरी : येथील नाशिक- मुबंई महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरा जवळील रोडच्या साईड पाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यानी ट्रकचे लॉक तोडून मोबाईल व रोख दहा हजार रुपये व डिझेल चोरी केली.

मुबंई नाशिक हायवेवर खालसा पंजाबी धाब्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी केली, या प्रकरणी ट्रक चालक हिरालाल धोली राजपुत (३१) याने इगतपुरीपोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर इगतपुरी पोलिसांनी चोरट्यांना रंगेहात पकडून ८४ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन फरार आरोपींचा शोध घेत आहेत. अधिक तपास

निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार साळूखे, विजय रुद्रे, पोलीस कर्मचारी करीत आहेत,

Web Title: Two arrested for stealing diesel from a truck on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.