ज्येष्ठ मतदारांच्या मदतीला नाशिकच्या विद्यार्थिनींनी सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 13:36 IST2019-10-21T13:32:01+5:302019-10-21T13:36:05+5:30
Maharashtra Election 2019 पंटवटीतील आरपी विद्यालयातील मतदान केंद्रावर विद्यालयातील विद्यार्थिनींनी ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आधार दिला.

ज्येष्ठ मतदारांच्या मदतीला नाशिकच्या विद्यार्थिनींनी सरसावल्या
नाशिक : शहरात विधानसभा निवडणुकीत मतदानाचा उत्साह दिसून येत आहेत. पावसाने उघडीप दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडत मतदानासाठी मतदान केंद्र गाठून मतदान केले. यावेळी पंचवटी भागातील आरपी विद्यालयासह विविध विद्यालयातील विद्यार्थिनींनी ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगाना प्रत्येक्ष मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.
नाशिक शहरात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध सामाजिक संघटनांसह स्वयंस्वेवी गट कार्यरत असताना विद्यार्थ्यांनीही या लोकोत्सवात मोलाचे योगदान दिले आहे. विविध शाळा महाविद्यालयांमधील ज्येष्ठ नागरिकांना वाहन तळापासून ते मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी आधार देताना दिसून आले. त्यातील काही विद्यार्थ्यांनी मतदारांना त्यांचे नाव यादीत शोधून देण्यासाठी मदत केली, तर काहींनी मतदारांना केंद्राच्या प्रवेशद्वारापासून मतदान केंद्र अधिकाऱ्यांपर्यंतची नोंद करण्यापर्यत आधार दिला. मतदान कक्षापपर्यंत साथ देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मतदान झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगाना पून्हा प्रवेशद्वारापर्यंत आणि वाहनतळापर्यंत सोडण्यासाठी मोलाची मदत केली.