सरळ सरळ दुरंगी लढतीचा रंगला सामना

By श्याम बागुल | Published: October 13, 2019 10:55 PM2019-10-13T22:55:44+5:302019-10-14T00:30:36+5:30

नाशिक पूर्व मतदारसंघात यंदा भाजपविरुद्ध राष्टÑवादी अशी सरळ सरळ दुरंगी लढत होत असून, दोन्ही तुल्यबळ उमेदवार असले तरी, या ...

Straightforward runner-up fight | सरळ सरळ दुरंगी लढतीचा रंगला सामना

सरळ सरळ दुरंगी लढतीचा रंगला सामना

Next
ठळक मुद्देनिवडणूक राग-रंग : नाशिक पूर्वकॉँग्रेस द्विधा मन:स्थितीत : भाजप, सेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

नाशिक पूर्व मतदारसंघात यंदा भाजपविरुद्ध राष्टÑवादी अशी सरळ सरळ दुरंगी लढत होत असून, दोन्ही तुल्यबळ उमेदवार असले तरी, या मतदारसंघात ऐनवेळी घडलेल्या राजकीय घटना, घडामोडी पाहता, त्यात कोण बाजीगर ठरतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासून पूर्व मतदारसंघात अनेक राजकीय घटना घडामोडी घडल्या. भाजपचे आमदार व शहराध्यक्ष असलेल्या बाळासाहेब सानप यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये यासाठी सानप विरोधकांनी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, तर सानप समर्थकांनीही उमेदवारी मिळावी यासाठी शक्तिप्रदर्शन केले; परंतु पक्षाने अखेरच्या दिवसापर्यंत सानप यांना उमेदवारी दिली नाही, उलटपक्ष मनसेकडून इच्छुक असलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज सानप यांनी राष्टÑवादीचे घड्याळ हाती बांधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
या मतदारसंघातून महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने माजी महापौर अशोक मुर्तडक यांना उमेदवारी दिली. त्यांनी नामांकनही भरले; परंतु माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडीत मुर्तडक यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीने कोणाला राजकीय लाभ होईल हे नव्याने सांगण्यास नको; मात्र याचवेळी कॉँग्रेस आघाडीतच बिघाडी झाली. जागावाटपात पूर्वची जागा कॉँग्रेसच्या वाट्याची असल्याने ही जागा कॉँग्रेसने कवाडे गटाला सोडलेली असताना राष्ट्रवादीने सानप यांना उमेदवारी देऊन बिघाडी केली; मात्र मतदारसंघात भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र निर्माण होत असताना कवाडे गटाचे गणेश उन्हवणे यांनी माघार घ्यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले गेले. त्यात यश मिळू शकले नाही. त्यामुळे वरकरणी या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र असले तरी, खरी लढत सानपविरुद्ध ढिकले अशीच आहे. दोन्ही पक्षांनी आयात उमेदवार दिल्याने जुने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांना निवडणुकीत कितपत साथ मिळते हा प्रश्नच आहे.
मतदारसंघातील
कळीचे मुद्दे
पंचवटी, नाशिकरोड या महत्त्वाच्या भागातील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.
४राष्टÑीय महामार्गाचे गेल्या वर्षापासून काम रखडले आहे.
४ धार्मिक स्थळांचा विकास व पर्यटनाला चालना कागदावरच.
४ रोजगार निर्मितीसाठी ठोस विशेष काहीच प्रयत्न नाहीत.
ग्रामीण भागाच्या विकासाचा प्रश्न
नाशिक पूर्व मतदारसंघात समाविष्ट असलेल्या ग्रामीण भागाचा विकासाचा प्रश्न कळीचा मुद्दा आहे. शहरी भागातील मतदारांपेक्षा ग्रामीण भागातील मतदारांच्या अपेक्षा व त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. शेतमळे व विरळ लोकवस्त्यांमुळे या भागात मूलभूत नागरी सोयी-सुविधा पुरविण्यात अद्यापही यश मिळालेले नाही. रस्त्यांची अवस्था बिकट असून, पाणीपुरवठ्याच्या सोयी पुरेशा प्रमाणात होऊ शकलेल्या नाहीत. याशिवाय विजेचा प्रश्न कायम आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचाही विषय तितकाच महत्त्वाचा असून, शेती व्यवसाय बेभरवशाचा झाल्याने त्यावर कायमस्वरूपी पर्याय शोधणे गरजेचे आहे.
बदललेली समीकरणे
विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये नाशिक पूर्व मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. या मतदारसंघात पंचवटी, मखमलाबाद, नाशिकरोड, आडगाव, जेलरोड, पंचक, दसक या भागांचा समावेश आहे. शहरी व ग्रामीण असे संमिश्र मतदार आहेत.
२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत आघाडी विरुद्ध युती आणि मनसे अशी तिरंगी लढत झाली. त्यात मनसेने उत्तमराव ढिकले यांना उमेदवारी दिली व त्यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत राष्टÑवादीचे देवीदास पिंगळे यांनी बंडखोरी केली होती. मात्र त्याचा फायदा मनसेलाच झाला.
२०१४ च्या निवडणुकीत युती आणि आघाडी तसेच मनसेने स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यावेळी मोदी लाटेत भाजपच्या बाळासाहेब सानप यांनी बाजी मारली. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत.

 

Web Title: Straightforward runner-up fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.