हाथरस घटनेचा येवल्यात शिवसेनेकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:10 IST2020-10-05T22:34:48+5:302020-10-06T01:10:41+5:30
येवला : शहर व तालुका शिवसेना, युवा सेना यांच्या वतीने हाथरस घटनेचा निषेध करण्यात आला.

येवला येथे हाथरस घटनेचा निषेध करत तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी.
येवला : शहर व तालुका शिवसेना, युवा सेना यांच्या वतीने हाथरस घटनेचा निषेध करण्यात आला.
तहसीलदार प्रमोद हिले यांना आमदार किशोर दराडे, संभाजी पवार, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे यांचे हस्ते निवेदन देण्यात आले. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याची घटना अत्यंत क्रूर व मानवतेला काळीमा फासणारी आहे. त्यापेक्षा निंदनीय बाब म्हणजे उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाने पीडित मुलीच्या घरच्यांना डांबून ठेवून तिचा मृतदेह परस्पर दहन करून दडपशाही पद्धतीने सदर घटना दडपण्याचा प्रयत्न केला. या घटनेची सर्वस्वी जबाबदारी योगी सरकारने घेऊन तात्काळ राजीनामा द्यावा व सदर घटनेतील आरोपींना तात्काळ पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ‘योगी सरकार मुर्दाबाद’, ‘हाथरस पिडीतेस न्याय मिळालाच पाहिजे’, अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी तहसील कार्यालय दणाणून सोडले होते.
निवेदनावर पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, उपसभापती मंगेश जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख प्रज्वल पटेल, शहर प्रमुख लक्ष्मण गवळी, श्याम गुंड, ऋ षिकेश भवर, अशोक आव्हाड, योगेश भवर, अनिल गवंडी, बाळू गवंडी, धीरज जावळे, शुभम सुर्यवंशी, प्रसाद सोनवणे, अक्तर मोमीन, मिच्छंद्र पानसरे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.