Shiv Sena-BJP mellagay dallying | शिवसेना-भाजपकडून मालेगावी जल्लोष
शिवसेना-भाजपकडून मालेगावी जल्लोष

मालेगाव : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले बहुमत आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा विजय झाल्याने भाजप-शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील ठिकठिकाणी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
भाजपतर्फे रामसेतू पुलावर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. रामसेतू पुलानजीक श्रीराम मंदिरासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले. यावेळी भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन
करून जय भवानी, जय शिवाजी, भारतमाता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजप सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नेवीलकुमार तिवारी, नंदू शेवाळे, गजानन बच्छाव, बाळू अहिरे, मुकेश तिवारी, कुणाल पाटील, राजू अहिरे, गोलू वाघ, अक्षय पाटील, पप्पू कापडणे, बंटी पाटील, निशान मंत्री, शरद पवार, गोकुळ वानखेडे, सचिन परदेशी,  बाबूराव परदेशी, राहुल आघारकर, अमित संघवी, ओम गगराणी,
अनिल सूर्यवंशी, विलास कोतकर, जयेश भावसार, किशोर गढरी, समीर पाटील, राजू परदेशी, महेश शिंदे, अमित वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून निकालाची आकडेमोड सुरू होती. गुरुवारी मतमोजणी पार पडून अंतिम निकाल जाहीर झाले. राज्यात शिवसेना-भाजप युतीला यश मिळाले. तसेच धुळे मतदारसंघातून युतीचे उमेदवार सुरेश भामरे विजयी झाले. दिवसभर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दूरचित्रवाणी (टीव्ही)वर निकालाचे प्रेक्षपण पाहण्यासाठी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती.
सायंकाळी शिवसेनेचे महानगरप्रमुख रामा मिस्तरी, राजू अलिझाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
भाजपला मिळालेल्या यशाबद्दल मालेगाव येथील वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे पेढे वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष पापन्ना यादव, सचिव रवींद्र कुलकर्णी आदींंसह पदाधिकारी, विक्रेता बांधव उपस्थित होते.


Web Title:  Shiv Sena-BJP mellagay dallying
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.