शंभरी गाठलेल्या सखुबाई, पार्वताबाई आजी १९६०पासून बजावताहेत मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 13:13 IST2019-10-21T13:11:59+5:302019-10-21T13:13:10+5:30
आजींनी बोटाला लागलेली शाई दाखवित तरूणाईपुढे आदर्श ठेवला आहे.

शंभरी गाठलेल्या सखुबाई, पार्वताबाई आजी १९६०पासून बजावताहेत मतदानाचा हक्क
नाशिक :देवळाली विधानसभा मतदारसंघातील रहिवाशी असलेल्या सखुबाई चुंबळे आजी यांनी वयाची शंभरी गाठली असून त्या १९६० सालापासून विधानसभेच्या निवडणूकीत त्या सतत मतदानाचा हक्क अखंडितपणे बजावत आहेत. भगूर गावातील पार्वताबाई आजींनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी आपल्या नातवासोबत सखुबाई, पार्वताबाई आजींनी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन मतदान केले.
निवडणूकीत चुंबळे आजींनी आवर्जून मतदान केले आहेत. आजींनी बोटाला लागलेली शाई दाखवित तरूणाईपुढे आदर्श ठेवला आहे. भगूर गावातील पार्वताबाई आजींनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. पार्वताबाई आजी आपल्या नातवंडांच्या मदतीने मतदान केंद्रापर्यंत पोहचल्या. त्यांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर आजींनी आपल्या बोटावरील शाई मोठ्या अभिमानाने उंचावून दाखविली.