राजापूर परिसरात बैल पोळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:52 IST2020-08-19T16:51:45+5:302020-08-19T16:52:26+5:30
राजापूर : गाव परिसरात बैल पोळा सण सोशल डिस्टंसिंगचा वापर करत उत्साहात साजरा करण्यात आला.

राजापूर परिसरात बैल पोळा उत्साहात
ठळक मुद्दे बैल जोडींची पूजा करत गाव वेशीतून मिरवणूक काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : गाव परिसरात बैल पोळा सण सोशल डिस्टंसिंगचा वापर करत उत्साहात साजरा करण्यात आला. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर आठ दिवस अगोदर बैलांच्या साज व इतर साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. वर्षभर शेतकऱ्यांसाठी शेतीत राबणाºया बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत बळीराजाने मोठ्या आनंदाने बैल जोडींची पूजा करत गाव वेशीतून मिरवणूक काढली. घरी बैलांना गहू-बाजरीचे मदन व पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला गेला. (फोटो १९ राजापूर)