शिवसेना, मनसेकडून निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:30 IST2020-08-09T21:16:32+5:302020-08-10T00:30:42+5:30
नाशिक : कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात हटविल्याचे पडसाद शहरातही उमटले. शिवसनेच्या वतीने शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयासमोर कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, तर मनसेच्या वतीने पाथर्डीफाटा येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. अनेक संघटनांनीदेखील कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला आहे.

शिवसेना, मनसेकडून निषेध आंदोलन
नाशिक : कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात हटविल्याचे पडसाद शहरातही उमटले. शिवसनेच्या वतीने शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयासमोर कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, तर मनसेच्या वतीने पाथर्डीफाटा येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. अनेक संघटनांनीदेखील कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला आहे.
कर्नाटक मध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशानंतर हटविण्यात आला. रात्रीच्या सुमारास कारवाई करीत पुतळा हटविण्यात आल्याने कर्नाटकमध्येही या घटनेचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्रातदेखील या घटनेचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेने आंदोलन करीत निषेध नोंदविला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, अजय बोरस्ते, सचिन बांडे, विलास शिंदे, नाना काळे, उमेश मराठे, संतोष गायकवाड, सुधाकर बडगुजर, हरिभाऊ काळे आदींसह कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
पाथर्डीफाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला ‘जोडे मारो’ आंदोलन करून पुतळा दहन करण्यात आले. महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागी सन्मानाने बसविला नाही, तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. आंदोलनात अजिंक्य बोडके, ललित वाघ, अजिंक्य शिर्के, शंकर कणकुसे, ओमकार पवार, अक्षय माळी, तुषार कदम, संज्योत भाटी, अनिकेत झिटे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पालकमंत्री भुजबळ यांनी नोंदविला निषेध
बेळगाव जिल्'ातील मनगुत्ती या गावामध्ये महाराष्टÑाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जाणीवपूर्वक व सुडबुद्धीने हटविण्यात आला असून, या घटनेचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कर्नाटक सरकारने संबंधितांवर कडक कारवाई करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सन्मानाने पुनर्र्स्थापना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.