महिला बचत गटांना हप्ते वसुलीचा खाजगी फायनान्स कंपन्याचा तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:13 IST2020-08-23T20:35:34+5:302020-08-24T00:13:52+5:30
इगतपुरी : शहरात महिला बचत गटांनी व्यवसायासाठी ग्रामिण कट्टा व सर्वोदय फायनान्स कंपन्याकडुन कर्ज घेत व्यवसाय सुरू केला होता. मात्र मार्च मिहन्यापासुन कोरोना संसर्गामुळे लॉकडावुन झाल्याने अनेक बचतगट डबघाईला आले. त्यात हया फायनान्स कंपन्याच्या कर्ज वसुली पथकाने प्रत्येक बचत गटाच्या महलांच्या घरी जावुन हप्ते वसुलीचा तगादा केल्याने बचत गटाच्या महिलांनी काही दिवसाची मुभा मागीतली होती. मात्र वसुली पथकाचा तगादा वाढल्यामुळे सर्व बचत गटाच्या महिलांना मानिसक त्रास झाल्याने त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दि. २१ रोजी इगतपुरी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांना निवेदन दिले.

महिला बचत गटाच्या वतीने पोलीस निरिक्षक अशोक रत्नपारखी यांना निवेदन देतांना भास्कर गुंजाळ, संतोष सोनवणे व महिला.
लोकमत न्युज नेटवर्क
इगतपुरी : शहरात महिला बचत गटांनी व्यवसायासाठी ग्रामिण कट्टा व सर्वोदय फायनान्स कंपन्याकडुन कर्ज घेत व्यवसाय सुरू केला होता. मात्र मार्च मिहन्यापासुन कोरोना संसर्गामुळे लॉकडावुन झाल्याने अनेक बचतगट डबघाईला आले. त्यात हया फायनान्स कंपन्याच्या कर्ज वसुली पथकाने प्रत्येक बचत गटाच्या महलांच्या घरी जावुन हप्ते वसुलीचा तगादा केल्याने बचत गटाच्या महिलांनी काही दिवसाची मुभा मागीतली होती. मात्र वसुली पथकाचा तगादा वाढल्यामुळे सर्व बचत गटाच्या महिलांना मानिसक त्रास झाल्याने त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दि. २१ रोजी इगतपुरी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांना निवेदन दिले.
लॉकडावुन काळात उपासमारीची वेळ आली असतांना कर्जाचे हप्ते फेडायचे की कुटुंबाचा उदनिर्वाह करायचा असे असतांना शासनाने फायनान्स कंपन्या व बँकाना कर्ज वसुली बाबत काही निर्देश दिले होते. मात्र तरीही खाजगी फायनान्स कंपन्या महिलांना त्रास देत कर्ज वसुलीचा तगादा करीत पठाणी वसुलीचा अवलंब करीत असल्याने महिलांचे जगणे कठीण झाले आहे. वसुली पथकाची दंडेलशाही सुरू आहे या जाचाला कंटाळुन आठ दिवसा अगोदर बचतगटांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन दिले होते. पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या करीता संबधीत वसुली पथकावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा म्हणुन पोलीस निरिक्षक अशोक रत्नपारखी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा महिलांच्या जीवीतास काही धोका झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहिल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भास्कर गुंजाळ, संतोष सोनवणे, किरण रायकर, विशाल रोकडे, महिला बचत गटाच्या अर्चना चिकणे, चित्रा पालवे, सारीका कुसवकर, मनिषा निकम, निकीता जगताप, राणी शिंदे, रीना पंडित, सुरेखा पवार, सायराबी शेख, नाजमिन शेख, सरला जगताप, पुष्पा साबळे, निर्मला साबळे, निता गावंडा, राधा उबाळे, अफरीन शेख, संध्या गायकवाड, मनिषा आहिरे, पुष्पा चिकणे आदी उपस्थीत होत्या.