इगतपुरी तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:47 IST2021-05-30T21:13:30+5:302021-05-31T00:47:30+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या मशागती झाल्या असून पावसाच्या प्रतीक्षेत असताना रविवारी (दि. ३०) मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भाग काहीसा सुखावला आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागाला या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले तर घोटी, इगतपुरी, गोंदे, वाडीवऱ्हे, यासह पूर्वभागातील परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.

Pre-monsoon rain in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस

इगतपुरी तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस

ठळक मुद्देपूर्व भागात बहुतांश ठिकाणी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली

घोटी : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या मशागती झाल्या असून पावसाच्या प्रतीक्षेत असताना रविवारी (दि. ३०) मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भाग काहीसा सुखावला आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागाला या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले तर घोटी, इगतपुरी, गोंदे, वाडीवऱ्हे, यासह पूर्वभागातील परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.

पूर्व भागात बहुतांश ठिकाणी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली तर घोटी व परिसरात विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाल्याने वाढत्या उष्णतेने कासावीस झालेल्या नागरिकांना पावसाच्या गारव्याने काहीसा दिलासा दिला. साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्याच्या पूर्व भागातून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. सोबत जोराचा वाराही होती. घोटीसह ग्रामीण भागात या वारा पावसामुळे वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता.

Web Title: Pre-monsoon rain in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.