बोहल्यावर चढण्यापूर्वी लॉन्स परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:23 IST2020-02-01T19:15:48+5:302020-02-01T19:23:18+5:30

अंदरसुल : लक्ष्मीनारायण लॉन्स मध्ये शुक्रवारी (दि. ३१) झालेल्या लग्न सोहळ्यास वधू-वरांसह मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करुन प्रारंभ करण्यात आला.

Planting trees in the lawn area before climbing | बोहल्यावर चढण्यापूर्वी लॉन्स परिसरात वृक्षारोपण

बोहल्यावर चढण्यापूर्वी लॉन्स परिसरात वृक्षारोपण

ठळक मुद्देमान्यवरांचा वृक्ष रोपे देऊन सत्कार केला.

अंदरसुल : लक्ष्मीनारायण लॉन्स मध्ये शुक्रवारी (दि. ३१) झालेल्या लग्न सोहळ्यास वधू-वरांसह मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करुन प्रारंभ करण्यात आला. येथील सेवानिवत्त फौजी हरीचंद्र थोरात यांची कन्या रु पाली व रहाता तालुक्यातील परशराम मोरे यांचे सुपुत्र दीपक यांचा विवाह सोहळा झाला. भागीनाथ थोरात यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावण्याची गरज आणि वृक्षवल्ली हीच आमची सोयरी या हेतूने मान्यवराचा सत्कार समारंभ टाळून सर्व मान्यवरांचा वृक्ष रोपे देऊन सत्कार केला. वधु-वरांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी लॉन्स परिसरात वृक्षारोपण करून पाहुण्यांना पर्यावरणाचा संदेश दिला व थोरात परिवाराने व्याहीभेट वृक्षरोपे भेट देऊन केली. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख भागीनाथ थोरात यांची पुतणीचा हा विवाह होता.

Web Title: Planting trees in the lawn area before climbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.