नवरात्र उत्सव हरिनाम सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 19:04 IST2020-10-28T19:04:18+5:302020-10-28T19:04:50+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे नवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह होत असतो. या सप्ताहाला शंभर वर्षांची परंपरा आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे शासन नियमांचे पालन करत निवडक उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाकाळातही घोटी शहराने अध्यात्माची परंपरा कायम ठेवून शिस्त, अध्यात्म व संस्कृतीचा त्रिवेणी संगम घडवला असल्याचे मत कीर्तनकारांनी व्यक्त केले.

Navratra celebration concludes Harinam week | नवरात्र उत्सव हरिनाम सप्ताहाची सांगता

नवरात्र उत्सव हरिनाम सप्ताहाची सांगता

ठळक मुद्देकोरोनाकाळातही घोटी शहराने जपली अध्यात्माची आदर्श परंपरा

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे नवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह होत असतो. या सप्ताहाला शंभर वर्षांची परंपरा आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे शासन नियमांचे पालन करत निवडक उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. कोरोनाकाळातही घोटी शहराने अध्यात्माची परंपरा कायम ठेवून शिस्त, अध्यात्म व संस्कृतीचा त्रिवेणी संगम घडवला असल्याचे मत कीर्तनकारांनी व्यक्त केले.
घोटीत बुधवारी (दि.२८) नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप काल्याच्या कीर्तनाने व निवडक भाविकांच्या उपस्थितीत दिंडी सोहळ्याने झाला. गुलाब महाराज खालकर यांनी काल्याचे कीर्तन केले.

येथील हरिनाम सप्ताहाला १०६ वर्षांची परंपरा आहे. कोरोनाकाळात झालेल्या सप्ताहात राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने झाली. फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व मास्कचा वापर करीत निवडक भाविकांना उपस्थितित सप्ताह पार पडला.
सप्ताहात ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, भगीरथ काळे, संजयनाना धोंगडे, एकनाथ महाराज सदगीर, जगन्नाथ पाटील, उमेश दशरथे, धनंजय गतीर, जगदीश जोशी, मठाधिपती माधव महाराज घुले, कोमलसिंह राजपूत, अनिल तुपे यांची कीर्तने झाली.
सांगतेला शहरातून नगरप्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी हरिनामाचा गजर करण्यात आला. महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
 
Web Title: Navratra celebration concludes Harinam week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.