पैसे वाटपावरून नाशिकच्या सिडकोत तणाव, पोेलीसांचा सौम्य लाठीमार
By संजय पाठक | Updated: January 15, 2026 14:07 IST2026-01-15T14:07:10+5:302026-01-15T14:07:41+5:30
Nashik Municipal Corporation Election: सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ आणि २९ मध्ये पैसे वाटप होत असल्याच्या कारणाने आज दुपारी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या सावतानगर येथील कार्यालयामागे असलेल्या उद्यानात पैसे वाटप होत असल्याची चर्चा सुरू झाल्याने पैसे घेण्यासाठी प्रचंड मोठी रांग लागली होती.

पैसे वाटपावरून नाशिकच्या सिडकोत तणाव, पोेलीसांचा सौम्य लाठीमार
-दिनेश पाठक
नाशिक- सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ आणि २९ मध्ये पैसे वाटप होत असल्याच्या कारणाने आज दुपारी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या सावतानगर येथील कार्यालयामागे असलेल्या उद्यानात पैसे वाटप होत असल्याची चर्चा सुरू झाल्याने पैसे घेण्यासाठी प्रचंड मोठी रांग लागली होती. जवळपास सहा ते सात हजार महिला व पुरुष येथे जमले होते. ही माहिती मिळताच शिंदे सेनेचे उमेदवार ॲड.अतुल सानप व अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आपल्या कार्यकर्त्यांसह बडगुजर यांच्या कार्यालयावर आल्याने दोन्ही तिन्ही गट समोरासमोर आले.
दोघा गटाच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली त्यामुळे तणाव अधिकच वाढला. त्यावेळेस पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले. त्याच ठिकाणी मुकेश शहाणे यांना पोलिसांनी आपल्या व्हॅनमध्ये बसवले. मुकेश शहाणे यांनी त्यावेळेस पोलिसांना विनंती केल्यानंतर त्यांना व्हॅनमधून बाहेर सोडण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या उद्यानाला कुलूप ठोकले. तसेच बडगुजर यांचे कार्यालय देखील बंद पाडण्यास कार्यकर्त्यांना भाग पाडले त्यामुळे तेथे तणाव निवळला. मात्र अतिरिक्त कुमक या ठिकाणी मागविण्यात आल्यानंतर पोलिसांची पेट्रोलिंग देखील वाढवण्यात आली.