नांदगावी संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:52 IST2021-02-18T23:05:06+5:302021-02-19T01:52:31+5:30

नांदगाव : बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील मुळ्डोंगरी, जातेगाव ढेकू, खुर्द आदी भागांतील बंजारा समाजाच्या तांड्यावर विविध कार्यक्रम पार पडले.

Nandgaon Sant Sewalal Maharaj Jayantinimitta program | नांदगावी संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम

मुळ्डोंगरी येथे बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात बंजारा भगिनीसोबत नृत्य करताना अंजली कांदे व अन्य महिला. 

ठळक मुद्देकांदे यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

नांदगाव : बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील मुळ्डोंगरी, जातेगाव ढेकू, खुर्द आदी भागांतील बंजारा समाजाच्या तांड्यावर विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अंजली सुहास कांदे उपस्थित होत्या. यावेळी कांदे यांनी बंजारा महिलांप्रमाणे वेशभूषा केली होती, तसेच त्यांनी पारंपरिक बंजारा गाण्यांवर नृत्य केले. कांदे यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे नियोजन एन.के. राठोड यांनी केले.
 

Web Title: Nandgaon Sant Sewalal Maharaj Jayantinimitta program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.