सर्वाधिक अपक्ष नाशिक पश्चिम, नांदगावमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 00:30 IST2019-10-09T00:25:45+5:302019-10-09T00:30:21+5:30
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये ७२ अपक्ष उमेदवारदेखील नशीब आजमावत आहेत. सर्वाधिक अपक्षांची संख्या नाशिक पश्चिम आणि नांदगावमध्ये प्रत्येकी ११ इतकी आहे.

सर्वाधिक अपक्ष नाशिक पश्चिम, नांदगावमध्ये
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये ७२ अपक्ष उमेदवारदेखील नशीब आजमावत आहेत. सर्वाधिक अपक्षांची संख्या नाशिक पश्चिम आणि नांदगावमध्ये प्रत्येकी ११ इतकी आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळूनही जवळपास २४५ उमेदवारांनी ३४५ इतके नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. छाननीअंती २१२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. युती, आघाडीच्या राजकारणात दररोज घडणाऱ्या घडामोडींमुळे अनेक महत्त्वाकांक्षी इच्छुकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रत्यक्षात अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर असंख्य अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अर्ज माघारीनंतर अपक्षांची संख्या कायम राहिली. नांदगाव आणि नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक प्रत्येकी ११ अपक्ष असून, मालेगाव मध्यमध्ये दहा अपक्षांची उमेदवारी आहे. सर्वांत कमी म्हणजे केवळ एकच अपक्ष कळवण आणि निफाड मतदारसंघात आहे. मालेगाव बाह्यमध्ये ६, बागलाण ३, कळवण १, चांदवड ४, येवला ३, सिन्नर ३, निफाड १, दिंडोरी ०, नाशिक पूर्व ७, नाशिक मध्य ४, नाशिक पश्चिम ११, देवळाली ४, इगतपुरी ४ याप्रमाणे अपक्ष उमेदवारांची संख्या आहे.
काही अपक्षांना थांबविण्यात अधिकृत उमेदवारांना यश आले असल्याने आता अपक्षांचे फारसे आव्हान कुठे नसल्याचे चित्र आहे.