मोदींना देशापेक्षा माझ्या कुटुंबाची चिंता - पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 05:23 IST2019-04-12T05:22:58+5:302019-04-12T05:23:13+5:30
नाशिकमध्ये सभा : केंद्र सरकारवर टीका

मोदींना देशापेक्षा माझ्या कुटुंबाची चिंता - पवार
नाशिक : प्रचारातील तीन सभांमध्ये माझ्यावर टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या सभेत मात्र शरद पवार तिकडे कसे, ते इकडे पाहिजे होते, असे म्हणाले. त्यामुळे ते माझे विरोधक आहेत की हितचिंतक हेच कळत नाही, असा टोला लगावून शरद पवार यांनी, शेती व शेतकरी उद््ध्वस्त होत असताना मोदींना देशापुढील प्रश्नांपेक्षा माझ्या कुटुंबाची चिंंता वाटते, त्यांनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये, त्यापेक्षा देशाची काळजी करावी, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ सिद्ध प्रिंपी येथे आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात लहान विचारांचे लोक सत्तेवर आल्याने त्याची किंमत आज देशातील प्रत्येक समाजघटक मोजत आहे. शेती व शेतकऱ्यांचे प्रश्नांविषयी सरकारला आस्था नाही, त्यामुळे शेतकरी उद््ध्वस्त होत आहे. गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचे आमिष दाखविणाºया सरकारने धान्याच्या हमीभावात सरासरी २० ते ३५ टक्के वाढ केली. मात्र मनमोहन सिंग यांच्या काळात सरकारने शेतकºयांच्या हमीभावात शंभर टक्के वाढ केली, त्याचबरोबर शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी लागू करून शेतकºयांचा सातबारा कोरा केला होता. आज नेमकी याउलट परिस्थिती आहे. शेतकºयांच्या शेतमालाला भाव नाही, उत्पादनाचा खर्चही निघत नाही. शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी चुकून संधी दिलेल्या सरकारचा सर्वांनीच अनुभव घेतला आहे.
पवार यांनी जागवल्या ‘पुलोद’च्या आठवणी
१९८५ मध्ये शरद पवार यांनी पुलोद आघाडी स्थापन करून निवडणूक लढविली त्या वेळी जिल्ह्यातून पुलोदचे १४ आमदार निवडून आले होते. त्याची आठवण पवार यांनी सभेत करून दिली. ते म्हणाले, शेतकरी, कष्टकºयांना न्याय देण्यासाठी तेव्हा पुलोद आघाडी स्थापन करण्यात आली.
शेतीच्या प्रश्नावर जिल्ह्याने कायमच एकजूट दाखविली. शरद जोशी व अन्य नेत्यांनी शेतकºयांमध्ये जागृती निर्माण केली. त्यातूनच पुलोदचे सर्व उमेदवार नाशिक जिल्ह्यातून निवडून आले. आम्ही सत्ता स्थापन करू शकलो, असे ते म्हणाले.