घोटीत वंजारी समाजाची बैठक, शहराध्यक्षपदी वालतुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:44 IST2020-08-19T16:41:14+5:302020-08-19T16:44:22+5:30
घोटी : इगतपुरी तालुका वंजारी समाजाच्या वतीने घोटी येथील इंद्रप्रस्थ लॉन्स येथे बैठक घेण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र देवराम वालतुले यांची एकमताने निवड करण्यात आली.

इगतपुरी तालुका वंजारी समाज घोटी शहराध्यक्षपदी निवडीप्रसंगी गोरख बोडके, राजेंद्र वालतुले,दत्तात्रय लहामंगे , विठ्ठल वालतुले, संजय मूर्तडक, आनंदा मूर्तडक व पदाधिकारी.
घोटी : इगतपुरी तालुका वंजारी समाजाच्या वतीने घोटी येथील इंद्रप्रस्थ लॉन्स येथे बैठक घेण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र देवराम वालतुले यांची एकमताने निवड करण्यात आली.
इगतपुरी तालुक्यात वंजारी समाज मोठ्या प्रमाणात असून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. समाज एकसंघटीत करण्याआठी कायर्कारणीची घोषणा याप्रसंगी करण्यात आली. त्याठिकाणी घोटी हा उद्योगाचा केंद्र बिंदू असल्याने घोटी शहराध्यक्षपदी राजेंद्र वालतुले यांची एकमताने निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी दत्तात्रय लहामगे, सचिव कैलास लहामगे, खजिनदार नरेंद्र मूर्तडक, जिवन मुर्तडक, आकाश लहामगे, सचिन तारगे, धमर्राज आव्हाड, संजय लहामगे, रविंद लहामगे, सूयर्कांत मुर्तडक यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी घोटी मर्चंट बँकेचे संचालक विठ्ठल वालतुले, उद्योजक संजय मुर्तडक, आनंदा मुर्तडक उपस्थित होते.