इगतपुरी तालुक्यात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2023 13:44 IST2023-01-02T13:39:17+5:302023-01-02T13:44:34+5:30
बिबट्या मुक्त संचार करतांना दिसला.

इगतपुरी तालुक्यात बिबट्याचे दर्शन
इगतपुरी, जि. नाशिक (गणेश घाटकर): इगतपुरी येथील तळेगाव शिवारातील कपारेश्वर महादेव येथे डोंगराजवल फिरायला गेलेल्या नागरिकांना सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या मुक्त संचार करतांना दिसला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
नागरिक भयभीत झाले होते. सदर बिबट्याला सकाळी फिरायला गेलेल्या बाळा चौधरी, तानाजी चौधरी, तानाजी रायकर, रामदास चौधरी, रमेश वाघ, विठ्ठल मेंगाळ यांनी पाहिले व तात्काळ वन विभागाला ही माहिती कळवण्यात आली. बिबट्या हा तळेगाव डॅम परिसरातील भक्ष करण्यासाठी कुत्रे, पाळीव प्राणी खायला येत असल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. बिबटयाच्या दर्शनामुळे सदर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"