अंगणगाव येथे शासकीय मका, बाजरी खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:43 IST2020-11-21T23:27:06+5:302020-11-22T01:43:12+5:30

येवला : तालुक्यातील अंगणगाव येथे झालेल्या शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी किंमत योजनेंतर्गत मका व बाजरी खरेदी केंद्राचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

Launch of Government Maize, Bajra Shopping Center at Angangaon | अंगणगाव येथे शासकीय मका, बाजरी खरेदी केंद्राचा शुभारंभ

अंगणगाव येथे शासकीय मका, बाजरी खरेदी केंद्राचा शुभारंभ

ठळक मुद्देजगभरात कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेला सुरुवात

येवला : तालुक्यातील अंगणगाव येथे झालेल्या शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी किंमत योजनेंतर्गत मका व बाजरी खरेदी केंद्राचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

महसूल विभागामार्फत ऑनलाइन सातबारा उपलब्ध झाल्याने शेतमाल खरेदीत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसणार असून, शेतकर्‍यांना नक्कीच न्याय मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, अ‍ॅड. माणिक शिंदे, येवला बाजार समिती सभापती उषा शिंदे, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रांत अधिकारी सोपान कासार यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. अडीच लाख टन मका उत्पादन होण्याच्या दृष्टीने मका खरेदी केंद्र सुरू केले. त्यानंतर दोन वेळेस मुदतवाढ देऊन जवळपास साडेअकरा लाख टन विक्रमी मका खरेदी केला गेला. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. शेतकर्‍यांच्या भरड धान्याला चांगला दर मिळण्यासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र उपयोगी ठरणार असून त्याचा शेतकर्‍यांनी फायदा करून घेणे गरजेचे आहे. बाजारभाव व हमीभावात मोठा फरक असल्याने व्यापारीवर्गाकडून हमीभाव केंद्रावर बाजरी, मका विक्रीला येणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे भुजबळ यांनी सांगितले.
जगभरात कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यात आता विकासकामे हळूहळू सुरू होतील; मात्र प्राधान्याने सर्वांनी स्वतःसह कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

 

 

Web Title: Launch of Government Maize, Bajra Shopping Center at Angangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.