राजापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 18:21 IST2020-08-16T18:21:13+5:302020-08-16T18:21:49+5:30

राजापूर : गाव परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राजापूर केंद्र शाळेत ध्वज पुजन सैनिक मंगेश बोडखे, प्रदिप कासार, यांचे हस्ते तर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरखनाथ भाबड यांचे हस्ते झाले.

Independence Day festivities at Rajapur | राजापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

राजापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

ठळक मुद्दे ग्रामपंचायतीत ध्वजपूजन ध्वजारोहण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : गाव परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राजापूर केंद्र शाळेत ध्वज पुजन सैनिक मंगेश बोडखे, प्रदिप कासार, यांचे हस्ते तर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरखनाथ भाबड यांचे हस्ते झाले.
ज्ञानप्रकाश आश्रम शाळेत ध्वजपूजन सैनिक सोन्याबापु वाघ, महेंद्र कोळपकर यांचे हस्ते तर सैनिक मंगेश बोडके यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. पर्णकुटी येथील ध्वजपूजन सैनिक प्रदीप कासार यांच्या हस्ते तर ध्वजारोहण वाघ यांचे हस्ते झाले. ग्रामपंचायतीत ध्वजपूजन ध्वजारोहण झाले. राजापूर विविध कार्यकारी सोसायटीत ध्वजपूजन व्हाईस चेअरमन लहानू आव्हाड यांचे हस्ते तर ध्वजारोहण चेअरमन नवनाथ वाघ यांचे हस्ते झाले.
माध्यमिक विद्यालयात ध्वजपूजन तुळशीराम विंचू यांचे हस्ते तर ध्वजारोहण संस्थेचे स्थानिक संचालक विजय सानप यांचे हस्ते झाले. प्रारंभी क्र ांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन नवनाथ वाघ यांचे हस्ते झाले तर शहीद पोलिस भास्कर भीमाजी सानप यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. वाघ वस्ती शाळेत ध्वजपूजन सुभाष अलगट यांचे हस्ते तर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल वाघ याचे हस्ते झाले. हवालदार वस्ती शाळेत ध्वजारोहण रामभाऊ वाघ यांचे हस्ते झाले. कार्यक्र मास मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title: Independence Day festivities at Rajapur