जनावरे चोरांची टोळी वाडीवºहे परिसरात सक्रि य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 23:03 IST2020-07-01T22:25:36+5:302020-07-01T23:03:20+5:30
वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे परिसरात जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असून, टोळी सक्रिय झाल्याने परिसरातीन शेतकऱ्यांचे पशुधन संकटात सापडले आहे.

जनावरे चोरांची टोळी वाडीवºहे परिसरात सक्रि य
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे परिसरात जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असून, टोळी सक्रिय झाल्याने परिसरातीन शेतकऱ्यांचे पशुधन संकटात सापडले आहे.
पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वाडीवºहे गावात रात्रीच्या वेळी जनावरे रस्त्यावर व इतरत्र बसलेली असतात. मध्यरात्रीनंतर काही अज्ञात लोक चारचाकी वाहनाने जनावरांना वाहनातून चोरून नेतात. त्याच प्रमाणे घराजवळ किंवा गोठ्यात बांधलेली जनावरेदेखील सोडून चोरून नेली जात असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. चार दिवसांपूर्वीही काही चांगली जनावरे चोरी गेली आहेत तर काल रात्री पुन्हा जनावरे चोरी गेली आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.