फडणवीस- ठाकरेंच्या सभेने बदलला नूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:50 IST2019-05-24T01:50:04+5:302019-05-24T01:50:56+5:30
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तारूढ पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सभा घेतल्या, तर विरोधकांनी शरद पवार यांच्यासह अन्य अनेक नेत्यांच्या सभा घेतल्या. परंतु ठाकरे- फडणवीस यांच्या सभांचा अधिक अनुकूल परिणाम युतीला झाला.

फडणवीस- ठाकरेंच्या सभेने बदलला नूर
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तारूढ पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सभा घेतल्या, तर विरोधकांनी शरद पवार यांच्यासह अन्य अनेक नेत्यांच्या सभा घेतल्या. परंतु ठाकरे- फडणवीस यांच्या सभांचा अधिक अनुकूल परिणाम युतीला झाला.
लोकसभा निवडणूक म्हटली की, नेत्यांच्या सभा आणि त्यातून मांडले जाणारे मुद्दे आलेच. विरोधकांनी शरद पवार यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री मधुकर पिचड अशा सर्व घटकांच्या सभा घेतल्या. परंतु ज्यांचा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही अशा राज ठाकरे यांचीदेखील सभा घेण्यात आली आणि मोदी विरोधात वातावरण पेटवण्यात आले. परंतु त्याचा लाभ मात्र त्यांना उठवता आला नाही.
विरोधकांच्या तुलनेत सत्तारूढ पक्षांच्या मोजक्याच सभा झाल्या. त्यातही नरेंद्र मोदी यांची सभा ही दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झाली. अन्य नेत्यांच्या बहुतांशी सभा शहरी भागात झाल्या, परंतु त्याचा प्रभाव शहरी मतदारांवर अधिक झाला. त्यामुळे केवळ गर्दी झाली म्हणजे वक्त्याची सर्व मते नागरिकांना पटतातच असे नाही हेदेखील स्पष्ट झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभा अधिक प्रभावी ठरल्या.
ठाकरेंची सभा
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिक शहरात घेतलेल्या सभेत अनेक मुद्द्यांना हात घातला. विशेषत: त्यांनी देशाची सुरक्षा, पाकिस्तान असे भावनिक विषय हाताळले. नाशिकच्या भूमिपुत्र असलेल्या सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा चर्चित ठरला.
पवारांची सभा
राष्टवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रणरणत्या उन्हात सिध्दपिंप्री, गिरणारे यासारख्या ग्रामीण भागात छोट्या, परंतु प्रभावी सभा घेतल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला भाव आणि सरकारची अनास्था हे त्यांचे मुद्दे प्रभावी ठरले.
राज ठाकरेंची सभा
लाव रे व्हीडीओ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाभाडे काढणाºया राज ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये घेण्यात आली. त्यावेळी चांगली गर्दी जमली होती. तथापि, राज ठाकरे यांच्या मुद्यांच्या आधारे निर्माण केलेले वातावरण मतात परावर्तीत झाले नाही.