येवला शहरात दत्त जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 01:19 IST2019-12-12T01:18:47+5:302019-12-12T01:19:32+5:30

येवला : शहरात ठिकठिकाणी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहर व कॉलनी भागातील सातही दत्त मंदिरांत सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळलेली होती.

Dutt's Birthday in Yeola City | येवला शहरात दत्त जन्मोत्सव

येवला शहरात दत्त जन्मोत्सव

ठळक मुद्देभाविकांची गर्दी : ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम


येवला येथील गुरु देव विश्वस्त संस्थेत गुरु दत्त जयंतीनिमित्त पूजन करताना तहसीलदार रोहिदास वारु ळे. समवेत उपस्थित भाविक.

 

 

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहरात ठिकठिकाणी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहर व कॉलनी भागातील सातही दत्त मंदिरांत सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळलेली होती.
येवल्यातील पारेगाव रोडवरील श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती उत्सवासह नाम-जप-यज्ञ साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाचे वाचन १२१ सेवेकऱ्यांनी केले. सातही दिवस विविध यागांचे आयोजन करण्यात आले होते. गणेश याग, मनोबोध याग, चंडी याग, गीताई याग, स्वामी याग, रूद्र याग यासह १० यागांचे आयोजन विधिपूर्वक करण्यात आले.
प्रहर सेवेत अखंड वीणावादन, अखंड स्वामीजप, स्वामीचरित्र वाचन करण्यात आले. बुधवारी दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्राचा तिसरा अध्यायाचे वाचन करून महाआरती व जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवारी (दि. १२) सत्यदत्त पूजन व महाआरतीने सप्ताहाची सांगता होणार आहे. स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ लक्षवेधी रांगोळी काढण्यात आली होती. या यज्ञ सप्ताहात श्रीगुरुचरित्र व श्रीमत्भागवत पारायणासाठी मोठ्या संख्येने सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला. दत्तात्रेय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सेवेकºयांनी कार्याक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
दत्त जयंतीनिमित्त हुडको वसाहतीत अष्टविनायक ग्रुपतर्फे वसाहतीतील दत्त मंदिरात पूजा-अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु देव दत्त विश्वस्त संस्थेत दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी संजय कुलकर्णी यांच्या हस्ते दत्तमूर्तीवर अभिषेक करण्यात आला. गोविंदनगर येथील मंदिरात दत्तपूजन करण्यात आले. दत्तवाडी येथे उमाकांत महाराज यांच्या हस्ते दत्तपूजा करण्यात आली.भाविकांना महाप्रसादाचे वाटपबस आगारात व शहर पोलीस ठाण्यात दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहर पोलीस ठाण्यात शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, उपनिरीक्षक मोरे, चंद्रकांत निर्मळ यांनी श्री दत्ताला अभिषेक करून पूजन केले. सावरगाव येथील स्वामी समर्थ केंद्रात दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Dutt's Birthday in Yeola City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.