संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:05 IST2020-12-28T23:47:46+5:302020-12-29T00:05:37+5:30
येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्यावतीने जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन्न झाला.

संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्काराचे वितरण
येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्यावतीने जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा संपन्न झाला.
सदर पुरस्कार वितरण सोहळा श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर सभागृहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सोमनाथ हाबडे होते. विशेष निमंत्रित म्हणून साहित्यिक नंदन रहाणे उपस्थित होते. उद्घाटन गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे प्रधान बलरामसिंग संधु यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नगगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, भोलानाथ लोणारी, किशोर सोनवणे, धनंजय कुलकर्णी, सुहास भांबारे, जयवंत खांबेकर, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवी संस्था पुरस्कार धडपड मंच अध्यक्ष प्रभाकर झळके यांना तर धार्मिकरत्न पुरस्कार निवृत्ती चव्हाण, दत्तात्रय जाधव यांना प्रदान करण्यात आला. सामाजिकरत्न पुरस्कार सतीश भांबारे, श्याम सारंगधर, अरविंद टापसे, महेश काबरा यांना तर शैक्षणिकरत्न पुरस्कार कुणाल दराडे, प्रवीण बनकर यांना प्रदान करण्यात आला. कलारत्न पुरस्कार चेतन बेदडे, श्रीकांत खंदारे, व्यसनमुक्तीरत्न संजयबापू कुलकर्णी, समाज प्रबोधनरत्न पुरस्कार अजय सोनवणे, संतोष विंचू, चेतन कोळस, आरोग्यरत्न पुरस्कार किरण वाटारे, उद्योगरत्न पुरस्कार विकास काकडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
समितीचे संस्थापक अध्यक्ष मुकेश लचके यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन पुरुषोत्तम रहाणे यांनी तर आभार राजेंद्र गणोरे यांनी मानले. कार्यक्रमास राम तुपसाखरे, राजेंद्र कल्याणकर, पुरुषोत्तम रहाणे, पांडुरंग खंदारे, राजेंद्र गणोरे, कवित माळवे, अमोल लचके, तुषार भांबारे, संदीप लचके, बळीराम शिंदे, रमाकांत खंदारे, मधुसुदन शिंदे, अक्षय निरगुडे, सोमनाथ शिंदे, आबा सुकासे, वरद लचके, सुनिल टिभे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.