देवदरीत विद्यार्थ्यांनी राबवले स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:06 IST2020-10-20T19:05:08+5:302020-10-20T19:06:12+5:30
येवला : तालुक्यातील धार्मिक देवस्थान व पर्यटन स्थळ असणार्या देवदरी येथील मंदिर परिसरात शिवाज्ञा करियर अकॅडमीच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

देवदरीत विद्यार्थ्यांनी राबवले स्वच्छता अभियान
ठळक मुद्देअरण्यवाचन, पक्षी निरीक्षण, जैवविविधता यातून विद्यार्थ्यांना वनपरिक्षण अभ्यास व्हावा या हेतू.
येवला : तालुक्यातील धार्मिक देवस्थान व पर्यटन स्थळ असणार्या देवदरी येथील मंदिर परिसरात शिवाज्ञा करियर अकॅडमीच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरातील संपूर्ण कचरा व कागद जमा करून त्याची विल्हेवाट लावली. अरण्यवाचन, पक्षी निरीक्षण, जैवविविधता यातून विद्यार्थ्यांना वनपरिक्षण अभ्यास व्हावा या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन अकॅडमीने केले होते.
अकॅडमी संचालक रामकृष्ण कोंढरे यांनी यावेळी विविध दुर्मिळ व आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती दिली. तसेच वन्यजीव व प्राण्याचे संरक्षण करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. याप्रसंगी शिक्षक बाळकृष्ण शिंदे, शैलेश पंडोरे आदी उपस्थित होते.