येवला नगरपरिषद स्वीकृत सदस्यपदी दीपक लोणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 00:59 IST2021-07-14T23:01:00+5:302021-07-15T00:59:37+5:30
येवला : नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

येवला नगरपरिषद स्वीकृत सदस्यपदी दीपक लोणारी
ठळक मुद्देएकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड.
येवला : नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राष्ट्रवादी कोट्यातून स्वीकृत सदस्य झालेल्या अजय जैन यांनी राजीनामा दिला होता. रिक्त जागेसाठी तहसीलदार प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली सभा नगरपरिषद सभागृहात बोलाविण्यात आली होती. सभेत तहसीलदार हिले यांनी स्वीकृत सदस्य पदासाठी लोणारी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. बैठकीस नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांच्यासह २४ सदस्य उपस्थित होते. दरम्यान, नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य लोणारी यांचा पालिकेच्यावतीने नगराध्यक्ष क्षीरसागर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
(१४ लोणारी)