बचत गटाच्या महिलांकडून प्रयाग तीर्थावर स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:37 IST2020-10-14T22:18:12+5:302020-10-15T01:37:06+5:30
नांदुरवैद्य : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर धार्मिक स्थळे, तसेच इतर यात्रोत्सव बंद असल्यामुळे अनेक दिवसांपासून भाविकांची पावले मंदिराकडे फिरकली नसल्याच्या पाशर््वभूमीवर गजलक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांनी प्रयाग तीर्थावर स्वच्छता मोहीम राबवत प्रयाग तीर्थासह मंदिर परिसर उजळून टाकला.

प्रयाग तीर्थावर स्वच्छता अभियानप्रसंगी उपस्थित शीतल भगरे, रुपाली गंगापुत्र, वनिता मोरे, वर्षा माहुलकर आदी.
नांदुरवैद्य : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर धार्मिक स्थळे, तसेच इतर यात्रोत्सव बंद असल्यामुळे अनेक दिवसांपासून भाविकांची पावले मंदिराकडे फिरकली नसल्याच्या पाशर््वभूमीवर गजलक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांनी प्रयाग तीर्थावर स्वच्छता मोहीम राबवत प्रयाग तीर्थासह मंदिर परिसर उजळून टाकला.
गजलक्ष्मी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा शीतल भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अभियानातील महिलांनी पेगलवाडी येथील प्रयाग तीर्थावर स्वच्छता मोहीम राबवत प्रयाग तीर्थातील पाण्यात असलेली घाण, कचरा साफ करत पाणी स्वच्छ केले. त्यानंतर मंदिर परिसरातील कागदाचे तुकडे, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आदीं घाण व कचरा एकञ करत विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात सचिव वनिता मोरे, उपाध्यक्ष वर्षा माहुलकर, हेमलता भडांगे, मीनाक्षी जिरेमाळी, रु पाली गंगापुत्र, मंजू जोशी, वर्षा पाटील, हर्षदा मोरे, अनिता मोरे, प्रतिभा रणमाळे, मीना दोबाडे आदी सहभागी झाले होते.