ब्रह्माकुमारी वासंती दीदी अमृत महोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 00:02 IST2021-11-10T00:00:37+5:302021-11-10T00:02:50+5:30

येवला : येथील ब्रह्माकुमारीज केंद्रात नाशिक जिल्हा उपक्षेत्रीय संचालिका वासंती दीदी यांचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Brahmakumari Vasanti Didi Amrit Mahotsav in excitement | ब्रह्माकुमारी वासंती दीदी अमृत महोत्सव उत्साहात

येवला येथील ब्रह्माकुमारीज केंद्रात वासंती दीदी यांचा अमृत महोत्सवानिमित्ताने सन्मान करताना माजी आमदार मारोतराव पवार. समवेत ब्रह्माकुमारीज.

ठळक मुद्देवासंती दीदी वयाच्या पंचविसाव्या वर्षी ईश्वरीय सेवेत संपूर्ण समर्पित झाल्या.

येवला : येथील ब्रह्माकुमारीज केंद्रात नाशिक जिल्हा उपक्षेत्रीय संचालिका वासंती दीदी यांचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वासंती दीदी वयाच्या पंचविसाव्या वर्षी ईश्वरीय सेवेत संपूर्ण समर्पित झाल्या. गेल्या ५० वर्षांत त्यांनी कुंभमेळ्यातील आध्यात्मिक मेळा, विश्वशांती वर्ष, महिला वर्ष, युवा वर्ष, विश्व योग दिन तसेच सायकल यात्रा, मोटरसायकल रॅली, महिला संमेलन, धर्म संमेलन, व्यसनमुक्ती अभियान तणावमुक्त जीवन यासारखे असंख्य उपक्रम यशस्वीपणे राबविले.

तसेच ब्रह्माकुमारी संस्थेच्या एज्युकेशन विंग व यशवंतराव मुक्त विद्यापीठ यांच्या जोडीने बनविलेला यश ब्रह्मा प्रोजेक्टही नाशिकमध्ये यशस्वीरीत्या राबविला आहे.
सोहळ्यात माजी आमदार मारुतीराव पवार, सरला दीदी, गोदावरी दीदी आदींनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी वासंती दीदी यांना नारी शक्ती अवॉर्ड, बनकर पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे विशेष आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व पुरस्कार, अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आध्यात्मिक योगदानासाठी विशेष सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध संस्था व संघटनांच्या वतीने यावेळी वासंती दीदी यांना स्मृतिचिन्ह व पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले.
नगरसेवक प्रवीण बनकर, सलीम काझी, राजेंद्र खेरुड, अश्विनी गंगापूरकर, स्मिता चांदवडकर, मीनाक्षी चांदवडकर, विकी बीवाल आदींनी यावेळी मनोगत केले. प्रा. सीताराम निकुंभ यांनी प्रास्ताविक तर नीता दीदी यांनी सूत्रसंचालन केले. आभारप्रदर्शन कोपरगाव येथील संचालिका ब्रह्माकुमारी सरला दीदी यांनी केले. कार्यक्रमास ब्रह्माकुमारी साधक उपस्थित होते.

 

Web Title: Brahmakumari Vasanti Didi Amrit Mahotsav in excitement