दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकजण ठार, दुसरा जखमी
By मनोज शेलार | Updated: April 28, 2023 17:42 IST2023-04-28T17:42:19+5:302023-04-28T17:42:34+5:30
शहादा तालुक्यातील शिरपूर रस्त्यावर हिंगणी गावाजवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकजण ठार, दुसरा जखमी
नंदुरबार: शहादा तालुक्यातील शिरपूर रस्त्यावर हिंगणी गावाजवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सारंगखेडा पोलिसात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा-शिरपूर रस्त्यावरील हिंगणी गावाजवळ शहाद्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या दुचाकीने (क्रमांक एमएच १८-एएम ८४४५) समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक एमएच ४१-एएन ७४९२) या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने धडक दिली. यात रवींद्र चतूर मोरे (३२)रा.खैरवे-भडगाव, ता.शहादा यांचा मृत्यू झाला, तर श्रीकांत युवराज पाटील (रा. वरूळ, ता. शिरपूर) हे गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भयंकर होता, की दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशांत दिलीप भिल (रा. पिपर्डे, ता. शहादा) यांनी सारंगखेडा पोलिसात फिर्याद दिल्याने अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.