विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातूनच पसार, उडाली दाणादाण

By मनोज शेलार | Updated: October 16, 2022 14:44 IST2022-10-16T14:42:12+5:302022-10-16T14:44:11+5:30

इंदास जुजाऱ्या पावरा (३४) रा.बिजरी, पावरापाडा, ता.धडगाव असे फरार आरोपीचे नाव आहे

The accused in the crime of molestation escaped from the police station itself | विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातूनच पसार, उडाली दाणादाण

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातूनच पसार, उडाली दाणादाण

मनोज शेलार
 
नंदुरबार : विनयभंगाच्या गुन्ह्यातील व न्यायालयीन कोठडी सुनावलेला आरोपी पोलीस ठाण्यातूनच पसार झाल्याची घटना धडगाव पोलीस ठाणे आवारात १५ रोजी सायंकाळी उशीरा घडली. याप्रकरणी फरार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदास जुजाऱ्या पावरा (३४) रा.बिजरी, पावरापाडा, ता.धडगाव असे फरार आरोपीचे नाव आहे. इंदास यास विनयभंगाच्या गुन्ह्याखाली धडगाव पोलिसांनी अटक केली होती. त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यासाठी त्याला नंदुरबार जिल्हा कारागृहात नेण्यात येणार होते. पुढील कायदेशीर सोपस्कार पार पाडण्यासाठी धडगाव पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले असता तेथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांच्या बंदोबस्ताच्या आखणीची तयारी सुरू होती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची तेथे गर्दी होती. त्या गर्दीचा फायदा घेऊन इंदास पावरा हा पसार झाला. जेंव्हा हे पोलिसांच्या लक्षात आले तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्याचा शोध घेतला असता मिळून आला नाही. याबाबत पोलीस कर्मचारी दिपक वारुळे यांनी फिर्याद दिल्याने इंदास पावरा विरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार प्रवीण महाले करीत आहे.

Web Title: The accused in the crime of molestation escaped from the police station itself