अक्कलकुवा येथे निवडणुकीचे पडसाद..... शिवसेना कार्यालय जाळले, अक्कलकुवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 11:45 IST2020-01-09T11:45:00+5:302020-01-09T11:45:32+5:30
बाजारपेठेत शुकशुकाट

अक्कलकुवा येथे निवडणुकीचे पडसाद..... शिवसेना कार्यालय जाळले, अक्कलकुवा बंद
नंदुरबार : अक्कलकुवा शहरातील महामार्गाच्या समोर असलेल्या शिवसेना संपर्क कार्यालयात बुधवारी रात्री उशिरा जाळपोळ झाल्याची घटना घडली. या ठिकाणी शिवसेना व भाजपमध्ये जुना वाद असून आता जि.प. निवडणुकीमध्ये एका गटात काँग्रेस विजयी झाल असून एका गटात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
त्यानंतर ही घटना घडली. गुरुवारी सकाळी ही घटना समजल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयावर मोठी गर्दी केली. दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यासाठी अक्कलकुवा पोलीस ठाणे आवारात जमाव जमला आहे. अक्कलकुवा शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट असून तणावपूर्ण शांतता आहे. शहरामध्ये जमावबंदी आदेश लागू नाही, असे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी सांगितले.