महाराष्ट्र निवडणूक 2019 निकालः नवापुर मतदारसंघातून काँग्रेसचे शिरीष नाईक विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 13:14 IST2019-10-24T13:14:34+5:302019-10-24T13:14:47+5:30
Maharashtra Election 2019 : Nandurbar's Navapur Constituency Result

महाराष्ट्र निवडणूक 2019 निकालः नवापुर मतदारसंघातून काँग्रेसचे शिरीष नाईक विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभेच्या नवापुर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक यांनी विजय मिळवला़ त्यांनी भाजपाचे भरत माणिकराव गावीत आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद कृष्णराव गावीत यांचा पराभव केला़
काँग्रसचे उमेदवार शिरीषकुमार नाईक यांना 72 हजार 957 मते मिळाली़ तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे भरत गावीत यांना 57 हजार 434 मते मिळाली़ मतदारसंघातून उमेदवारी करणारे अपक्ष उमेदवार शरद गावीत यांना 62 हजार 15 मते मिळाली आहेत़ अत्यंत चुरशीच्या झालेल्या या तिरंगी लढतीत शेवटच्या फेरीर्पयत उत्सुकता लागून होती़ शिरीष नाईक व भरत गावीत यांच्यातील या सामन्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होत़े विजयी उमेदवार शिरीष नाईक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे पुत्र आहेत़ तर त्यांचे प्रतिस्पर्धी भरत गावीत हे माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे माणिकराव गावीत यांचे पुत्र आहेत़ दोघांच्या लढतीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून होत़े तुल्यबळ अशा या सामन्यात शिरीष नाईक यांनी बाजी मारली आह़े त्यांच्या विजयानंतर नवापुरसह ठिकठिकाणी त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत होता़