नंदुरबारात एकाचा चाकूने भोसकून खून; एक संशयित ताब्यात, तीन फरार
By भूषण.विजय.रामराजे | Updated: April 9, 2023 23:21 IST2023-04-09T23:20:52+5:302023-04-09T23:21:15+5:30
पोलिसांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतले असून, इतर तीन फरार आहेत.

नंदुरबारात एकाचा चाकूने भोसकून खून; एक संशयित ताब्यात, तीन फरार
नंदुरबार : शहरातील उमापती महादेव मंदिर परिसरात पूर्ववैमनस्यातून एकाचा भोसकून खून केल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. कृष्णा अप्पा पेंढारकर (४५) रा.आंबेडकर चाैक, नंदुरबार असे मयताचे नाव आहे. मयताच्या नातेवाइकांतीलच चाैघांनी हे कृत्य केल्याची माहिती आहे.
पोलिसांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतले असून, इतर तीन फरार आहेत. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.पेंढारकर हे मोटारसायकलीने शेताकडे जात असताना, चाैघांकडून सुरुवातीला त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला, परंतु त्यांनी प्रतिकार केल्यानंतर लाठ्या-काठ्या आणि दगडाने ठेचून जखमी करत खून करण्यात आला.घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातून एकास संशयावरून अटक केली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत, पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळख देण्यात आलेली नव्हती.