अस्वलाच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी, तीन महिन्यातील दुसरी घटना
By मनोज शेलार | Updated: August 23, 2023 18:58 IST2023-08-23T18:58:11+5:302023-08-23T18:58:30+5:30
अस्वलाने हल्ला केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी नवलपूर, ता.अक्कलकुवा येथे घडली.

अस्वलाच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी, तीन महिन्यातील दुसरी घटना
वाण्याविहीर (नंदुरबार) : अस्वलाने हल्ला केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी नवलपूर, ता.अक्कलकुवा येथे घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या डोक्याचा मागील भागाला गंभीर ईजा झाली आहे. अककलकुवा तालुक्यातील व तळोदा पोलीस स्टेशन च्या हद्दीत असलेल्या नवलपुर येथे बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दिनकर वनकर वसावे (४०) हे शेतात चारा कापत असताना अस्वलाने अचानक हल्ला केला.
त्यांनी बचावासाठी आरडाओरड केला. अस्वलाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. तोपर्यंत डोक्याचा मागील भागात मोठी दुखापत केली. वसावे यांना तातडीने अककलकुवा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. तेथे औषधोपचार करून जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी देखील खुर्चीमाळ येथे कागड्या बारक्या नाईक या वृद्धावर अस्वलाने हल्ला करून दुखापत केली होती.