नंदुरबार मतदारसंघातून भारतीय ट्रायबल पार्टी रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:26 IST2019-03-27T21:07:01+5:302019-04-04T12:26:53+5:30
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय ट्रायबल पार्टीनेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून अशोक दौलतसिंग पाडवी यांची उमेदवारी जाहीर ...

नंदुरबार मतदारसंघातून भारतीय ट्रायबल पार्टी रिंगणात
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय ट्रायबल पार्टीनेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून अशोक दौलतसिंग पाडवी यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
भारतीय ट्रायबल पार्टी राज्यात नऊ ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. त्याबाबत मंगळवारी पार्टीचे पदाधिकारी प्रमोद नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. उमेदवार अशोक पाडवी हे वाण्याविहीर, ता.अक्कलकुवा येथील सरपंच आहेत. गुजरातमधील आमदार महेशभाई वसावा हे पार्टीच्या प्रचारासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.