फसव्या विकासाचा वाढदिवस साजरा करीत राष्ट्रवादीचे प्रतिकात्मक आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 19:05 IST2023-04-01T19:05:00+5:302023-04-01T19:05:12+5:30

नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे हे आंदोलन शनिवारी सकाळी करण्यात आले.

Celebrating the birthday of fraudulent development, NCP held a symbolic movement | फसव्या विकासाचा वाढदिवस साजरा करीत राष्ट्रवादीचे प्रतिकात्मक आंदोलन

फसव्या विकासाचा वाढदिवस साजरा करीत राष्ट्रवादीचे प्रतिकात्मक आंदोलन

रमाकांत पाटील/नंदुरबार

नंदुरबार : वाढती बेरोजगारी, महागाई आदी समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी जनतेला आश्वासनांचे लॉलीपॉप दिले आहे. विकासाच्या नावाखाली मोदी सरकारने जनतेला एप्रिल फूल बनविले आहे. याचा निषेध म्हणून प्रतीकात्मक आंदोलन करून फसव्या विकासाचा वाढदिवस साजरा करीत केक कापण्यात आला. 

नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे हे आंदोलन शनिवारी सकाळी करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे आणि राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील गिरीविहार गेट परिसरात केप कापून मोदी विकास म्हणजे फसवा विकास म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस साजरा करून एक प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच भारतीय जनता पार्टीने सत्तेत बसण्यासाठी जनतेला जे-जे आश्वासनांचे लॉलीपॉप दिले होते, त्याचा एक निषेध म्हणून जनतेला खरे लॉलीपॉप वाटप करून केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. वाढती बेरोजगारी, महागाई विरोधी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
 

Web Title: Celebrating the birthday of fraudulent development, NCP held a symbolic movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.