मालट्रकची मालवाहू रिक्षाला धडक, तीन जण ठार
By मनोज शेलार | Updated: May 7, 2023 17:41 IST2023-05-07T17:41:02+5:302023-05-07T17:41:24+5:30
मालट्रक व मालवाहू रिक्षा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

मालट्रकची मालवाहू रिक्षाला धडक, तीन जण ठार
नंदुरबार: मालट्रक व मालवाहू रिक्षा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मयत दोघे गुजरातचे तर एक जण मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. शहादा पोलिसात अपघातान्वये नोंद करण्यात आली आहे. हेमराज अंजने (३९, रा.सुरत), मनोज घाट्या (४२, रा. सुरत) व भगवानभाई गोविंद पंचुले (४८, रा. गोंदिया, मध्य प्रदेश) अशी मयतांची नावे आहेत.
गोलूभाई अंतिम व अनिकेत अंतिम या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहादाकडून गुजरातकडे जाणाऱ्या मालवाहू रिक्षाला (एमपी ०९ एचएच-५५११) समोरून येणाऱ्या मालट्रकने (क्रमांक जीजे ५ बी.एक्स-४४८३) जबर धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की मालवाहू रिक्षाचा पुढील भाग पूर्णपणे दाबला गेला. प्रकाशा ग्रामस्थ व दूरक्षेत्र पोलिस कर्मचाऱ्यांनी लागलीच धाव घेऊन मदतकार्य केले. याबाबत ट्रकचालकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.