ऐनवेळी दुसऱ्या पक्षात जावून मिळविली उमेदवारी; नांदेडमध्ये भाजपच्या २२ बंडखोरांची हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:36 IST2026-01-13T13:35:48+5:302026-01-13T13:36:06+5:30
भाजपा उमेदवाराच्या विरोधात अर्जही दाखल केला. अशा मंडळींवर भाजपाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ऐनवेळी दुसऱ्या पक्षात जावून मिळविली उमेदवारी; नांदेडमध्ये भाजपच्या २२ बंडखोरांची हकालपट्टी
नांदेड : महापालिका निवडणुकीत पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरी करीत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. तसेच उमेदवारीही दाखल केली होती. तर काही जणांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा प्रचार केला. अशा २२ मंडळींची भाजपाने हकालपट्टी केली आहे. तसे पत्रच महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी काढले आहे.
महापालिका निवडणुकीत सर्वाधिक इच्छुक हे भाजपाकडून होते. यातील बहुतांश जणांना शेवटच्या क्षणापर्यंत तिकीटाची प्रतीक्षा होती. परंतु त्यांच्या जागी दुसऱ्यांना तिकीटे देण्यात आली. त्यामुळे ऐनवेळी भाजपाला रामराम करून इतर पक्षात प्रवेश केला. तसेच भाजपा उमेदवाराच्या विरोधात अर्जही दाखल केला. अशा मंडळींवर भाजपाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यात शिरीष गंगाधर खोंडे, विनायक सगर, माणिक उर्फ विरेंद्र विनायक देशमुख, सुशीलकुमार चव्हाण, सुधाकर पांढरे, सुनील भालेराव, क्षीतिज जाधव, दुष्यंत सोनाळे, शेख फारुख, व्यंकट मुदिराज, भानुसिंह रावत, हुकुमसिंह गहलोत, कांचन गहलोत, मुन्नासिंह तेहरा, दिलीपसिंह सोडी, अनिल गाजुला, भीमराव गायकवाड, विश्वनाथ जटाळे, राजू गोरे, संतोष कांचनगिरे, प्रभू कपाटे आणि नवनाथ कांबळे यांचा समावेश आहे.